ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जानेवारीत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड शनिवारी दिल्लीत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका भारताने गमावल्या, परंतु तरी महेंद्रसिंग धोनीकडेच नेतृत्व कायम ठेवले जाणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १२ ते ३१ जानेवारी कालावधीत पर्थ, ब्रिस्बेन, मेलबर्न, कॅनबेरा, सिडनी येथे पाच एकदिवसीय सामने आणि अॅडलेड, मेलबर्न, सिडनी येथे तीन ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. भारतीय संघ ६ जानेवारीला ऑस्ट्रेलियाला प्रयाण करील.