पाकिस्तानकडून दोन गुणांनी हरलेल्या पुरुष संघाला उपविजेतेपद

व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील कबड्डीमध्ये भारतीय महिला संघाने विजेतेपदाला गवसणी घातली, मात्र पुरुष संघाला पाकिस्तानकडून हरल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, अशी माहिती भारतीय हौशी कबड्डी असोसिएशनने दिली आहे.

महिलांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने थायलंडला ४१-३१ अशा फरकाने नामोहरम केले. पुरुषांच्या सामन्यात अखेरच्या क्षणापर्यंत रंगत टिकून होती. मात्र पाकिस्तानने दोन गुणांनी बाजी मारली.