मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला पोटऱ्यांतील स्नायू दुखावल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाबाहेर राहावे लागणार आहे. स्टार्कच्या जागी दक्षिण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनला संघात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना रविवारी अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर १०७ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान स्टार्कला दुखापत झाली होती. स्टार्कने या सामन्यात सहा षटकांमध्ये २५ धावा देत एक बळी मिळवला होता. दुखापतीमुळे स्टार्कला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले आहे. त्याला आठवडय़ाभाराची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून पुढील आठवडय़ात त्याच्या संघनिवडीबाबत निर्णय घेण्यात येईल. त्याच्या जागी केन रिचर्डसनला संधी देण्यात आली आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या संघाचे फिजिओ अॅलेक्स कोऊन्टोरीस यांनी पत्रकात म्हटले आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















