आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅच हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत, ही भेट म्हणजे भारत क्रीडा महासत्ताच असल्याचे आणि भारताकडे ऑलिम्पिक स्पर्धेचे संयोजन करण्याची क्षमता असल्याचे द्योतक आहे, असे आयओसीचे मानद सदस्य रणधीर सिंग यांनी येथे सांगितले.
रणधीर पुढे म्हणाले, ‘‘बॅच यांच्याशी मी नुकतीच चर्चा केली होती व ते भारतास भेट देण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. विशेषत: त्यांना मोदी यांची भेट घेण्यात जास्त औत्सुक्य आहे. बॅच यांच्या भेटीमुळे भारतात क्रीडाविषयक आणखी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.’’