सलामीच्या लढतीत २०० धावांचा डोंगर उभारल्यानंतरही पराभवाला सामोरे जावे लागलेल्या चेन्नई सुपर किंग्ससमोर आता सूर गवसलेल्या दिल्लीला रोखण्याचे आव्हान आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, महेंद्रसिंग धोनी, फॅफ डू प्लेसिस आणि सुरेश रैना अशी चेन्नईकडे फलंदाजीची मजबूत फळी आहे. मात्र गोलंदाजी हा चेन्नईसाठी चिंतेचा विषय आहे. आशिष नेहरा आणि पवन नेगीऐवजी ईश्वर पांडे आणि बाबा अपराजितला संधी मिळू शकते. ड्वेन ब्राव्हो तंदुरुस्त होणे चेन्नईसाठी महत्त्वाचे आहे.
दुसरीकडे दिल्लीने कोलकातावर थरारक विजय मिळवत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. दिनेश कार्तिक आणि जेपी डय़ुमिनी दिल्लीच्या फलंदाजीचा कणा आहे. रॉस टेलरला अद्यापही सूर गवसलेला नाही. केव्हिन पीटरसन कधी परतणार हा उत्सुकतेचा विषय आहे. सलामीच्या जोडीचा फॉर्म दिल्लीसाठी चिंतेचा विषय आहे. नॅथन कोल्टिअर नील, मोहम्मद शमी, राहुल शर्मा, जेमी नीशाम या चौकडीवर गोलंदाजीची जबाबदारी आहे.
संघ :
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, ब्रेंडन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, आशिष नेहरा, मोहित शर्मा, सॅम्युअल बद्री, बेन हिल्फेनहॉस, मॉट हेन्री, बाबा अपराजित, मिथुन मन्हास, ईश्वर पांडे, पवन नेगी, विजय शंकर, रोनित मोरे, जॉन हॅस्टिंग्स.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), मुरली विजय, रॉस टेलर, क्विंटन डि कॉक, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मनोज तिवारी, राहुल शर्मा, मयांक अगरवाल, नॅथन कोल्टिअर नील, जेपी डय़ुमिनी, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, मिलींद कुमार, शाहबाझ नदीम, जिमी नीशाम, वेन पारनेल, एच.एस.शरथ, लक्ष्मी रतन शुक्ला, राहुल शुक्ला, जयंत यादव, सौरभ तिवारी.