आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी संघ मालकांकडून लावण्यात येणाऱया बोलीवरून मी खेळाडूंची पारख करत नाही, असे मत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड व्यक्त केले. खेळाडूंच्या क्षमतेची आणि त्यांच्यातील कौशल्याची त्यांच्यावर लावण्यात येणाऱया बोलीवरून वर्गवारी केली जाऊच शकत नाही, असे तो म्हणाला.
द्रविड म्हणाला, आयपीएलची लिलाव प्रक्रियेची मला पूर्ण माहिती आहे. ही प्रक्रिया मी जवळून पाहिलेली नाही. एखाद्या खेळाडूवर जास्त बोली लावण्यात आली म्हणजे तो खेळाडू इतरांपेक्षा महत्त्वाचा खेळाडू होतो, असे मी मानत नाही. संघ प्रशिक्षक म्हणून मला सर्व खेळाडू समान आहेत. एखादा महत्त्वाचा आणि एखादा कमी महत्त्वाचा असे अजिबात नाही.