मागील सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना सामन्यात पावसाचे पाणी फेरले गेले. सामना सुरू होण्याआधीच पावसाच्या व्यत्ययाने नाणेफेक देखील होऊ शकला नाही आणि पंचांना सामना  रद्द झाल्याचे घोषित करावे लागले. सामन्याच्या पंचांनी रात्री अकरा वाजता अखेरची पाहणी करून सामना खेळवता येऊ शकणार नसल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यात आता या सामन्याचा प्रत्येकी एक गुण देण्यात येईल.  बेंगळुरूचा घरच्या मैदानात त्यांचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना होता. त्यामुळे या सामन्यात बेंगळुरुच्या फलंदाजीवर साऱ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते.

कोहली, एबी डी’व्हिलियर्स आणि ख्रिस गेलसारखे महान फलंदाज संघात असूनही बेंगळुरुला फक्त ४९ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे यापुढच्या सामन्यांसाठी बेंगळुरुच्या संघाला फलंदाजीवर कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.