१३२ ही ट्वेंटी ट्वेंटीच्या मानाने अतिशय किरकोळ धावसंख्य़ा. कोलकात्याला १३१ वर आॅलआऊट केल्यानंतर बंगळुरूच्या खात्यात एक विजय जमा होणार असंच सगळ्यांना वाटत होतं पण झालं उलटंच. बंगळुरूचा संघ  ४९ ला आॅलडाऊन झाला

बंगळुरूने टाॅस जिंकत कोलकात्याला पहिली बॅटिंग दिल्यानंतर कोलकात्याची बॅटिंग १३१ रन्समध्येच गुंडाळली गेलं. सुनील नरीनने पहिल्या ओव्हरपासूनच फटकेबाजी सुूरू केली. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने १८ रन्स काढल्या. पण नंतर कोलकात्याच्या विकेट्स झटपट पडत गेल्या आणि ते १३१ ला आॅलडाऊन झाले.

१३१ चं आव्हान बंगळुरू सहज पार करेलं अशी अपेक्षा असताना त्यांच्या संघ पन्नास रन्सच्या खाली आॅलडाऊन व्हावा यासारखी मोठी नामुष्की नाही.

मॅचच्या आधीच्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सना गुजरात लायन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यांना गुणतालिकेच्या अव्वल स्थानावर असणाऱ्या मुंबईवर दबाव वाढवायचा असेल तर त्यांना ही मॅच जिंकणं गरजेचं होतं. आणि ते त्यांनी समर्थपणे केलं.

LIVE UPDATES:

११:२७- बंगळुरू ४९ वर आॅलआऊट, मॅच कोलकात नाईट रायडर्सच्या खिशात

११:०६ – स्टुअर्ट बिन्नीही पॅव्हेलियमध्ये, बंगळुरू ४०-६

११:०३- ख्रिस गेल गेला. बंगळुरू ४०-५

१०:४०: बंगळुरूची तिसरी विकेट

१०:३०- बंगळुरूच्या झटपट दोन विकेट्स

१०:११- कोलकाता १३१ ला आॅलआऊट, बंगळुरूसमोर १३२ चं आव्हान

१०:०२- कोलकात्याच्या ३ झटपट विकेट्स

९:३५- कोलकात्याच्या सहा विकेट्स गेल्या.

२१:२६- कोलकात्याला आणखी एक धक्का. युसुफ पठाण यष्टिचीत, कोलकाता ८४-४

९:१२- कोलकात्याला तिसरा धक्का, राॅबिन उथप्पा आऊट, ६६-३

९:०५- कोलकात्याची दुसरी विकेट, सुनील नरीन पॅव्हेलियनमध्ये, ६५-२

८:५५- कोलकात्याची पहिली विकेट, गौतम गंभीर माघारी

८:५०- गौतम गंभीर रनआऊट होता होता थोडक्यात बचावला

८:४५- गौतम गंभीरचा सुरेख चौकार

८:१५- पहिल्या ओव्हरमध्येच सुनील नरीनची फटकेबाजी, पहिल्या ओव्हरमध्ये १८ रन्स

८:१५ – बंगळुरूने टाॅस जिंकला, पहिली बाॅलिंग करणार