कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक फलंदाज रॉबीन उथप्पाने रायझिंग पुणे सुपरजाएंट्स विरुद्धच्या सामन्यात तीन फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा पराक्रम केला. आयपीएलमध्ये एकाच सामन्यात तीन फलंदाजांना यष्टीचीत करणारा तो दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीने ही किमया केली होती. पुण्याविरुद्धच्या सामन्यात उथप्पाने अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी आणि मनोज तिवारी या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना यष्टीचीत केलं.

त्यानंतर फलंदाजीतही उथप्पाने कमाल केली. कर्णधार गौतम गंभीर आणि उथप्पाने रचलेल्या १५८ धावांच्या भागिदारीच्या जोरावर कोलकात्याने पुण्यावर सात विकेट्सने मात केली.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

 

सामन्यात पुण्याने कोलकात्याला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले होते. पण गंभीर आणि उथप्पाने दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या १५८ धावांच्या भागिदारीने कोलकात्याने सहज विजय प्राप्त केला. उथप्पाने ४७ चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांसह ८७ धावांची खेळी उभारली. गंभीरने ४३ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह ६२ धावांची खेळी केली.