आयपीएलच्या अंतिम सामन्यात IPL 2017 Final Match चुरसीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजाएंट्सला अवघ्या एका धावेनं पराभूत केलं. मुंबई आणि पुणे यांच्यात रंगलेला अंतिम सामना हा अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. जॉनसनने गोलंदाजीतील धार दाखवून देत मुंबईला विजय मिळवून दिला. पुणे संघाला विजयासाठी एका चेंडूमध्ये ४ धावांची आवश्यकता होती. या चेंडूवर केवळ दोन धावा देत जॉनसनने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईच्या विजयानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हैदराबादच्या स्टेडिअमवरच नव्हे तर मुंबई पुण्यासह इंग्लंडमध्येही मुंबईच्या विजयाचे सेलिब्रेशन करण्यात आले. मुंबईच्या विजयाच्या आनंदाने इंग्लडचा क्रिकेटर जोस बटलरचे भान हरपल्याचे दिसले. अंगावर फक्त टॉवेल घेऊन सामना पाहण्यास बसलेला बटलर मुंबईच्या विजयानंतर विवस्र झाला. त्याने खुद्द फेसबुक अकाऊंटवरुन मुंबईच्या विजयानंतरचा आनंदी क्षण शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Cheteshwar Pujara Cryptic Post About Joining Chennai Super Kings
IPL 2024: चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील होणार? पुजाराच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
Suryakumar Yadav Rejoins Mumbai Indians Camp For IPL 2024
IPL 2024: ‘सूर्या’ उगवला; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, संघात दाखल होताच सुरू केला सराव
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: इरफान पठाणने नाव न घेता पंड्याला सुनावलं, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतरचं ट्विट होतंय व्हायरल

आयपीएलमधून अर्ध्यातूनच माघारी गेलेल्या बटलरने मुंबई-पुणे यांच्यात रंगलेला रोमहर्षक सामन्याचा मायदेशात आनंद घेतला. आगामी दक्षिण अफ्रिका दौरा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर जोस बटलरने आयपीएलच्या महत्वपूर्ण सामन्यातून माघार घेतली. मात्र, मायदेशी त्याने मुंबई आणि पुणे यांच्यातील अंतिम सामना आवर्जून पाहिला. तो टॉवेल अंगाला गुंडाळून सामना पाहत होता. शेवटच्या षटकात १ चेंडूत ४ धावा हव्या असताना जॉनसनने अचुक मारा करत मुंबईला विजय मिळवून देताच बटलरचा उत्साह शिगेला पोहोचला. त्याला आपण कोणत्या अवस्थेत आहोत, याचे भानच राहिले नाही. विवस्र होऊन त्याने मुंबईच्या विजयाचा आनंद साजरा केला.

शेवटच्या षटकात पुण्याच्या संघाला विजयासाठी ६ चेंडूत ११ धावांची गरज होती. जॉनसनच्या पहिल्याच चेंडूवर तिवारीने चौकार ठोकला. ५ चेंडूत ७ धावा अशी परिस्थिती निर्माण झाली असताना दुसऱ्या चेंडूवर जॉनसनने तिवारीला पोलार्डकरवी झेलबाद केले. तर तिसऱ्या चेंडूवर त्याने स्मिथला बाद करत सामना मुंबईच्या बाजूने झुकवला. या षटकात दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवून जॉनसने मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाचे योगदान दिले.