दमदार फॉर्मात असलेला गुजरात लायन्स संघाचा कर्णधार सुरेश रैनाने सातत्यपूर्ण कामगिरीने ऑरेंज कॅप पटकावली आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ही ऑरेंज कॅप देण्यात येते. सध्याच्या आकडेवारीनुसार रैना सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या विजयानंतर रैनाकडे ऑरेंज कॅप आली. रैनाने ही कॅप आपल्या चिमुकल्या मुलीला समर्पित केली आहे.
रैनाने बेंगळुरूविरुद्ध नाबाद ३४ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर तो सर्वाधिक धावांच्या यादीत प्रथम क्रमांकावर पोहोचला. मग रैनाने सोशल मीडियावर आपल्या चिमुकल्या ग्रॅसिया हिच्यासोबतचा फोटो ट्विट करून आपली ऑरेंज कॅप तिला समर्पित केली.

रैनाच्या गुजरात लायन्सने बेंगळुरू विरुद्ध अप्रतिम कामगिरी करत टीम कोहलीला १३४ धावांपर्यंत रोखले होते. प्रत्युत्तरात गुजराने हे आव्हान सहज गाठले. गुजरातने सात विकेट्सने विजय प्राप्त केला. आरोन फिंच याने गुजरातकडून यावेळी मॅच विनिंग खेळी साकारली. फिंच ७२ धावांवर बाद झाल्यानंतर रैनाने अखेरपर्यंत मैदानात टीच्चून फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. रैनाने नाबाद ३४ धावा केल्या. यासह रैनाच्या खात्यात ८ सामन्यांमध्ये ३०९ धावा जमा झाल्या. गुजरात लायन्सचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2017 suresh raina dedicates orange cap to daughter gracia
First published on: 28-04-2017 at 20:35 IST