यंदाच्या आयपीएल हंगामासाठी आज (सोमवार) क्रिकेट खेळाडुंची लिलाव प्रक्रिया पार पडली. मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडुंना आपल्याकडे घेण्यासाठी प्रत्येक संघांमध्ये चांगलीच चुरस लागली होती. त्यामुळे अनेक खेळाडुंना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळाल्याचे आजच्या लिलाव प्रक्रियेवेळी दिसून आले. परंतु काही खेळाडुंच्या हाती निराशा आल्याचे दिसून आले. यामध्ये मार्टिन गप्टिल, ब्रॅड हॉग व सौरभ तिवारीसारख्या दिग्गज खेळाडुंना खरेदीदारच मिळाला नाही. लिलाव प्रक्रियेत विकले गेलेल्या व न विकल्या गेलेल्या खेळाडुंच्या यादीवर टाकू एक नजर..
विकले गेलेले खेळाडू:
इऑन मॉर्गन (मूळ किंमत २ कोटी)- किंग्ज इलेव्हन पंजाब (२ कोटी)
पवन नेगी (३० लाख)- रॉयल चँलेजर्स बेंगळुरू (१ कोटी)
अँजेलो मॅथ्यूज (२ कोटी)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (२ कोटी)
बेन स्टोक्स (२ कोटी)- रायझिंग पुणे सुपरजायंटस (१४.५० कोटी)
कोरे अँडरसन (१ कोटी)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (१ कोटी)
निकोलस पूरन (३० लाख)- मुंबई इंडियन्स (३० लाख)
कैगिसो रबाडा (१ कोटी)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (५ कोटी)
ट्रेंट बोल्ट (१.५ कोटी)- कोलकाता नाइट रायडर्स (५ कोटी)
टायमल मिल्स (५० लाख)- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१२ कोटी)
पॅट कमिन्स (२ कोटी)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (४. ५ कोटी)
मिशेल जॉन्सन (२ कोटी)- मुंबई इंडियन्स (२ कोटी)
अंकित बावणे (१० लाख)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (१० लाख)
तन्मय अग्रवाल (१० लाख)- सनरायझर्स हैदराबाद (१० लाख)
मोहम्मद नबी (३० लाख)- सनरायझर्स हैदराबाद (३० लाख)
के. गौतम (१० लाख)- मुंबई इंडियन्स (२ कोटी)
राहुल तेवतिया (१० लाख)- किंग्ज इलेव्हन पंजाब (२५ लाख)
आदित्य तरे (२० लाख)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (२५ लाख)
एकलव्य द्विेदी (३० लाख)- सनरायझर्स हैदराबाद (७५ लाख)
अनिकेत चौधरी (१० लाख)- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२ कोटी)
टी. नटराजन (१० लाख) – किंग्ज इलेव्हन पंजाब (३ कोटी)
नाथू सिंग (३० लाख)- गुजरात लॉयन्स (५० लाख)
बसील थंपी (१० लाख)- गुजरात लायन्स (८५ लाख)
एम. अश्विन (१० लाख)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (१ कोटी)
तेजस बारोका (१० लाख)- गुजरात लायन्स (१० लाख)
रशीद खान (५० लाख)- सनरायझर्स हैदराबाद (४ कोटी)
प्रवीण तांबे (१० लाख)- सनरायझर्स हैदराबाद (१० लाख)
ख्रिस व्होक्स (२ कोटी)- कोलकाता नाइटरायडर्स (४.२ कोटी)
करण शर्मा (३० लाख)- मुंबई इंडियन्स (३.२ कोटी)
रिशी धवन (३० लाख)- कोलकाता नाइट रायडर्स (५५ लाख)
मॅट हेन्री (५० लाख)- किंग्ज इलेव्हन पंजाब (५० लाख)
जयदेव उनाडकत (३० लाख)- रायझिंग पुणे सुपरजायंटस (३० लाख)
वरूण अॅरान (३० लाख)- किंग्ज इलेव्हन पंजाब (२.८ कोटी)
मनप्रीत गोनी ( ३० लाख)- गुजरात लायन्स (६० लाख).

न विकले गेलेले खेळाडू:

मार्टिन गप्टिल (मूळ किंमत ५० लाख)
जेसॉन रॉय (५० लाख)
फैज फैजल (३० लाख)
अॅलेक्स हेल्स (१ कोटी)
रॉस टेलर (५० लाख)
सौरभ तिवारी (३० लाख)
इरफान पठाण (५० लाख)
सीन अबॉट (३० लाख)
ख्रिस जॉर्डन (५० लाख)
बेन डन्क (३० लाख)
जॉनी बेअरस्टॉ (१.५ कोटी)
आंद्रे प्लेचर (३० लाख)
जॉन्सन चार्ल्स (३० लाख)
दिनश चांदीमल (५० लाख)
नॅथन कोल्टर-नील (१ कोटी)
केल अबॉट (१.५ कोटी)
इशांत शर्मा (२ कोटी)
लक्षण संदाकन (३० लाख)
इश सोधी (३० लाख)
ब्रॅड हॉग (५० लाख)
प्रग्यान ओझा (३० लाख)
इम्रान ताहिर (५० लाख)
उमंग शर्मा (१० लाख)
पृथ्वी शॉ (१० लाख)
उन्मुक्त चंद (३० लाख)
असगर स्टनेकाझी (२० लाख)
आकाशदीप नाथ (१० लाख)
महिपाल लॉमरोर (१० लाख)
प्रवीण दुबे (१० लाख)
शिवम दुबे (१० लाख)
मनन शर्मा (१० लाख)
ऋषि कलारिया (१० लाख)
प्रियांक किरिट पांचाळ (१० लाख)
विष्णू विनोद (१० लाख)
श्रीवत्स गोस्वामी (१० लाख)
मोहम्मद शहजाद (५० लाख)
मोहित अहलावत (१० लाख)
मनविंदर बिस्ला (१० लाख)
अबू नेचिम (१० लाख)
उमर नझीर मीर (१० लाख)
नवदीप सैनी (१० लाख)
पवन सुयाल (१० लाख)
मयांक डागर (१० लाख)
सरबजित लड“डा (१० लाख)
मिचेल स्विप्सन (३० लाख)
अक्षय वाखरे (१० लाख)
मनोज तिवारी (५० लाख)
चेतश्वेर पुजारा (५० लाख)
अभिनव मुकूंद (३० लाख)
मिचेल क्लिंगर (५० लाख)
एस. बद्रीनाथ (३० लाख)
मर्लन सम्युल्स (१ कोटी)
इव्हिन लेव्हिस (५० लाख)
डॅरेन ब्राव्हो (५० लाख)
निक मॅडिसन (५० लाख)
परवेझ रसूल (३० लाख)
जेसॉन होल्डर (१.५ कोटी)
डेव्हिड व्हिज (३० लाख)
थिसेरा परेरा (५० लाख)
फरहान बेहरादिन (३० लाख)
अन्मूल हक (३० लाख)
शेन डॉवरिच (३० लाख)
कुसल परेरा (५० लाख)
निरोशॅन डिकवेला (३० लाख)
ब्रॅड हॅडिन (१.५ कोटी)
ग्लेन फिलिप्स (१० लाख)
आरपी. सिंग (३० लाख)
बिली स्टॅन्लेक (३० लाख)
पंकज सिंग (३० लाख)
बेन लॉलिन (३० लाख)
फवाद अहमद (३० लाख)
मिचेल बिअर (३० लाख)
अकिला धननजया (३० लाख)
नॅथन लॉयन (१.५ कोटी)
राहुल शर्मा (३० लाख)