इंडियन प्रीमिअर लीगच्या(आयपीएल) दहाव्या पर्वासाठी सोमवारी बंगळुरूत खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. आयपीएलमधील प्रत्येक संघाला आपल्या ताफ्यात जास्तीत जास्त २७ खेळाडूंचा समावेश करण्याची मुभा आहे. त्यानुसार आज झालेल्या लिलावात संघ मालकांनी आपापले संघ पूर्ण केले. आयपीएलचे यंदाच्या शेवटचे पर्व असल्याने यावेळी प्रत्येक संघावर खेळाडू खरेदीसाठी मर्यादा होत्या. कारण, पुढील वर्षी सर्वच खेळाडूंचा नव्याने लिलाव होणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या लिलाव प्रक्रियेत देखील अनपेक्षित लिलावांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इंग्लंडचा बेन स्टोक्सला १४ कोटी ५० लाखांची सर्वाधिक बोली मिळाली, तर भारताकडून टी.नटराजन या युवा खेळाडूवर ४ कोटींची बोली लागली. विशेष म्हणजे, दोन कोटींची पायाभूत किंमत निश्चित करण्यात आलेल्या इशांत शर्मावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. दुसरीकडे पहिल्यांदाच लिलाव प्रक्रियेत संधी मिळालेल्या अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनीही लक्ष वेधले. रशीद खान याला पहिल्याच फटक्यात चार कोटींचा भाव मिळाला, तर मोहम्मद नबी ३० लाखांच्या बोलीसह सन रायझर्स हैदराबादने संघात दाखल करून घेतले.
आयपीएलचा लिलाव संपुष्टात आल्यानंतर सर्व संघांची स्थिती कशी आहे. कोणत्या संघाचे पारडे जड आहे? याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलमधील संघांचे संपूर्ण खेळाडू पुढीलप्रमाणे-

सन रायझर्स हैदराबाद-

नव्याने दाखल झालेले खेळाडू: तन्मय अग्रवाल (१० लाख), मोहम्मद नबी (३० लाख), एकलव्य द्विवेदी (७५ लाख), रशीद खान (४ कोटी), प्रवीण तांबे (१० लाख), ख्रिस जॉर्डन (५० लाख), बेन लाफलिंग (३० लाख), मोहम्मद सिराज (२ कोटी ६० लाख)

संघाने कायम ठेवलेले खेळाडू: शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, डेव्हिड वॉर्नर, हेन्रीकस, नमन ओझा, रिकी भुइ, केन विल्यमसन, सिद्धार्थ कौल, विपुल शर्मा, आशिष नेहरा, युवराज सिंग, केन कटिंग, अभिमन्यू मिथून, मिस्तफिजूर रेहमान, वरिंन्दर सरण, दीपक हुडा, विजय शंकर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-

नव्याने दाखल झालेले खेळाडू : पवन नेगी (१ कोटी), टायमल मिल्स (१२ कोटी), अनिकेत चौधरी (२ कोटी), प्रवीण दुबे (१० लाख), बिली स्टॅनलेक (३० लाख)

संघाने कायम ठेवलेले खेळाडू : विराट कोहली, केएल राहुल, एबी डी’व्हिलियर्स, ख्रिस गेल, यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल, मनदीप सिंग, अॅडम मिलने, सरफराज खान, एस.अरविंद, केदार जाधव, शेन वॉटसन, स्टुअर्ट बिन्नी, सॅम्युअल बद्री, इक्बाल अब्दुल्ला, ट्रावीस हेड, सचिन बेबी, अवेश खान.

रायझिंग पुणे सुपरजाएंट्स-

नव्याने दाखल झालेले खेळाडू : बेन स्टोक्स (१४.५० कोटी), जयदेव उनाडकट (३० लाख), राहुल चहार (१० लाख), सौरभ कुमार (१० लाख), डॅन ख्रिस्तन (१ कोटी), मिलिंद तंडन (१० लाख), आर.त्रिपाठी (१० लाख), मनोज तिवारी (५० लाख), लॉकी फर्गुसन (५० लाख)

संघाने कायम ठेवलेले खेळाडू : एम.एस.धोनी, अजिंक्य रहाणे, आर.अश्विन, स्टीव्ह स्मिथ, फॅ ड्यु प्लेसिस, मिचेल मार्श, अशोक डिंडा, अंकुश बैन्स, रजत भाटीया, अंकित शर्मा, इश्वर पांडे, अॅडम झम्पा, जसकरन सिंग, बाबा अपराजित, दीपक चहार, उस्मान ख्वाजा, मयांक अग्रवाल.

गुजरात लायन्स-

नव्याने दाखल झालेले खेळाडू: नथू सिंग (५० लाख), बसिल थंम्पी (८५ लाख), तेजस सिंग बरोका (१० लाख), मनप्रीत गोनी (६० लाख), जेसन रॉय (१ कोटी), मुनाफ पटेल (३० लाख), चिराग सुरू (१० लाख), शेली शौर्या (१० लाख), शुभम अग्रवाल (१० लाख), प्रथम सिंग (१० लाख), आकाशदिप नाथ (१० लाख)

संघात कायम ठेवण्यात आलेले खेळाडू : सुरेश रैना, रवींद्र जडेजा, जेम्स फॉकनर, ब्रँडन मॅक्क्युलम, ड्वेन ब्राव्हो, आरोन फिंच, ड्वेन स्मिथ, दिनेश कार्तिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, अँड्र्यू ट्ये, इशान किशन, प्रदीप सांगवान, शिविल कौशिक, शादाब जकाती, जयदेव शहा.

कोलकाता नाईट रायडर्स-

नव्याने दाखल झालेले खेळडू: ट्रेंट बोल्ट (२ कोटी), ख्रिस वोक्स (४.२० कोटी), रिशी धवन (५५ लाख), गोलंदाज कुलर नाईल (३.५ कोटी), रोवमन पॉवेल (३० लाख), आर.संजय यादव (१० लाख), इशान जग्गी (१९ लाख), डॅरेन पॉवेल (५० लाख), सायन घोष (१० लाख)

संघात कामय ठेवण्यात आलेले खेळाडू :
गौतम गंभीर, सुनील नरेन, कुलदीप यादव, मनिष पांडे, सुर्यकुमार यादव , पीयुष चावला, रॉबीन उथप्पा, शाकिब अल हसन, ख्रिस लायन, उमेश यादव, युसूफ पठाण, शेल्डोन जॅक्सन, अंकित सिंग राजपूत, आंद्रे रसेल

 

 

मुंबई इंडियन्स –

नव्याने दाखल झालेले खेळाडू: निकोल्स पुरन (३० लाख), मिचेल जॉन्सन (२ कोटी), के.गोथम (२ कोटी), कर्ण शर्मा (३.२ कोटी), सौरभ तिवारी (३० लाख), ए.गुनारत्ना (३० लाख), के.खेज्रोलिया (१० लाख)

संघात कायम ठेवण्यात आलेले खेळाडू : रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, अंबाती रायुडू, जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल, लेंडेल सिमन्स, विनय कुमार, पार्थिव पटेल, मिचेल मॅक्लिघन, नितिश राणा, सिद्धेश लाड, जे.सुचिथ, हार्दिक पंड्या, जोस बटलर, टीम साऊदी, जेथीश शर्मा, कुणाल पंड्या, दीपक पुनिया.

दिल्ली डेअरडेव्हील्स-

नव्याने दाखल झालेले खेळाडू : अँजेलो मॅथ्युज (२ कोटी), कोरे अँडरसन (१ कोटी), कगिसो रबाडा (५ कोटी), पॅट कमिन्स (४.५० कोटी), अंकित बावणे (१० कोटी), आदित्य तरे (२५ लाख), मुरूगन अश्विन (१ कोटी), नवदीप सैनी (१० लाख), शशांक सिंग (१० लाख)

संघाने कायम ठेवलेले खेळाडू : जेपी ड्युमिनी, मोहम्मद शमी, क्विंटन डी कॉक, शहाबाज नदीम, जयंत यादव, अमित मिश्रा, श्रेयस अय्यर, जहीर खान, सॅम बिलिंग्ज, सजू सॅमसन, ख्रिस मॉरिस, कार्सोल ब्रेथवेट, करुण नायर, ऋषभ पंत, सीव्ही मिलिंद, सय्यद अहमद, प्रत्युश सिंग.

किंग्ज इलेव्हन पंजाब-

नव्याने दाखल झालेले खेळाडू : इऑन मॉर्गन (२ कोटी), राहुल टेवाटिया (२५ लाख), टी.नटराजन (३ कोटी), मॅट हेन्री (५० लाख), वरुण आरोन (२.८० कोटी), मार्टिन गप्तील (५० लाख), डॅरेन सॅमी (३० लाख), रिंकू सिंग (१० लाख)

संघात कायम ठेवण्यात आलेले खेळाडू : डेव्हिड मिलर, मनन वोरा, अक्षर पटेल, ग्लेन मॅक्सवेल, गुरूकिरत सिंग, अनुरित सिंग, संदीप शर्मा, शार्दुल ठाकूर, शॉन मार्श, वृद्धीमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक, मोहित शर्मा, मार्क्युस स्टोनिस, केसी कारिप्पा, अरमान जाफर, प्रदीप साहू, स्वप्निल सिंग, हाशिम आमला.