न्यायमूर्ती लोढा यांच्या समितीने आयीएलमधील भ्रष्टाचारासंबंधी दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त अभ्यास गटाने स्पर्धेशी संलग्न व्यक्तींकडून सूचनांचे संकलन केले असून, २८ ऑगस्टला कोलकाता येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
या अभ्यास गटात आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, खजिनदार अनिरुद्ध चौधरी, आयपीएल प्रशासकीय समितीचा सदस्य आणि माजी कर्णधार सौरव गांगुली व बीसीसीआयचे विधी सल्लागार उषानाथ बॅनर्जी यांचा समावेश आहे.
अभ्यासगटाने विविध स्वरुपाच्या सूचना केल्या आहेत. मात्र त्याविषयी आता तपशीलात काही सांगू शकत नाही असे राजीव शुक्ला यांनी सांगितले. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंचा सामना निश्चिती प्रकरणात सहभाग असल्याचा गौप्यस्फोट संघाची सहमालक प्रीती झिंटाने केला असल्याबाबत विचारले असता शुक्ला म्हणाले की, ‘‘प्रीतीने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले नाही. याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.’’