अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात इराणचा झुंजार खेळ साऱ्यांनीच पाहिला खरा, पण अतिरिक्त वेळेत जर लिओनेल मेस्सीने गोल केला नसता तर ‘ह’ गटाचे समीकरण वेगळे असू शकले असते. पण सध्याच्या घडीला ‘जर-तर’वर इराणचे भवितव्य अवलंबून आहे.
 बाद फेरीत पोहोचण्यासाठी नायजेरिया अर्जेटिनाकडून पराभूत झाल्यावरच इराणला संधी असेल. पण त्यांना त्यासाठी बोस्निया आणि हेझ्रेगोव्हिनावर अखेरच्या साखळी सामन्यामध्ये विजय मिळवावा लागेल.  त्यामुळे खेळाबरोबरच इराणची वाटचाल दैवावरही विसंबून असेल. बोस्नियाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे हा सामना बरोबरीत जरी सोडवला तर त्यांच्यासाठी ती मोठी गोष्ट असेल.
सामना क्र. ४४
‘फ’ गट : इराण वि. बोस्निया आणि हझ्रेगोव्हिना
स्थळ :  एरिना फोंटेनोव्हा, साल्वाडोर
वेळ :  रात्री. ९.३० वा. पासून