श्रीलंकेतील कसोटी सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्यामुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली असली तरी त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. विदर्भविरुद्धच्या सामन्यात भेदक मारा करीत त्याने तीन बळी मिळवले, पण फैझ फझलच्या अर्धशतकाच्या जोरावर विदर्भने पहिल्या दिवसअखेर ६ बाद २२२ अशी मजल मारली आहे.

विदर्भची सुरुवातच निराशाजनक झाली. सामन्याच्या पहिल्या चेंडूवर वसिम जाफर धावचीत झाला. त्यानंतर विदर्भला दुसरा धक्का १६ धावांवर बसला. पण त्यानंतर फझल आणि कर्णधार एस. बद्रिनाथ (४४) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. बद्रिनाथ बाद झाल्यावर काही वेळेत फझलला इशांतने माघारी धाडत संघाला मोठे यश मिळवून दिले. फझलने १४८ चेंडूंमध्ये प्रत्येकी एक चौकार आणि षटकार लगावत ५४ धावा केल्या. फझल बाद झाल्यावर गेल्या सामन्यात सलामीला आलेल्या आदित्य शनवारेने ४१ धावा करीत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इशांतने या वेळी तीन बळी मिळवले.