पहिल्यावहिल्या इंडियन सुपर लीगमध्ये दमदार कामगिरी करण्याच्या उद्देशाने मुंबई संघाने आपल्या ताफ्यात अनुभवी मॅन्युअल फ्रेडरिचला समाविष्ट केले आहे. फ्रेडरिचकडे व्यावसायिक फुटबॉलचा तब्बल १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सेंटर बॅक या भूमिकेत खेळणारा फ्रेडरिच ४१३ सामन्यांमध्ये खेळला आहे. जर्मनीचे प्रतिनिधित्व केलेला फ्रेडरिच बोरुसिया डॉर्टमंड, बेयर लेव्हरक्युसेन, वेर्डर ब्रेमेन आणि मेंझ या क्लबसाठी खेळला आहे. भारतात खेळणारा फ्रेडरिच जर्मनीचा पहिला प्रसिद्ध खेळाडू ठरणार आहे. आयएसएल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विदेशी खेळाडूंपैकी यंदाच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा अनुभव असणारा तो एकमेव खेळाडू आहे. ‘‘भक्कम बचाव आणि हवाई आक्रमणांसाठी ओळखला जाणारा ३४ वर्षीय फ्रेडरिच मुंबई संघाच्या बचाव फळीचा अविभाज्य घटक आहे. फ्रेडरिच आमच्या संघात असणे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. बचाव ही त्याची खासियत आहे. त्याच्या समावेशाने संघ बळकट होईल,’’ असे मुंबई संघाचा मालक आणि अभिनेता रणबीर कपूरने सांगितले.
आयएसएल स्पर्धेत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. आशिया खंडात खेळण्याचा मी विचार क रत होतो. ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. -मॅन्युअल फ्रे डरिच