भारताच्या आयोनिका पॉल हिने स्लोव्हेनियामध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक मिळवीत आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पदकाचे स्वप्न साकार केले. आयोनिका या २१ वर्षीय खेळाडूने पात्रता फेरीत ४१७.३ गुणांची नोंद केली. त्यानंतर अंतिम फेरीत तिने १८५.३ गुण नोंदवीत कांस्यपदक पटकाविले. हे पदक मिळविल्यानंतर आयोनिका म्हणाली, हे माझे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक असल्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे. माझ्या या यशाचे श्रेय ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट या संस्थेला द्यावे लागेल. त्यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळेच मला ऑस्ट्रियात सराव करण्याची व ख्यातनाम प्रशिक्षक थॉमस फर्निक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्याची संधी साधता आली.