मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद युगांडाच्या जॅकसन किपरूपयाने पटकावले आहे. दहाव्या आंतराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनला आज(रविवार) मोठ्या जल्लोषात सुरूवात झाली. पूर्ण मॅरेथॉनमध्ये युगांडाच्या जॅकसन किपरूप याने पुरुष गटात विजय मिळवला त्याने २ तास ९ मिनिटे ३२ सेकंदात अंतर पार केले. त्याला ४००० हजार अमेरिकन डॉलरचे बक्षिस आणि करंडक भेट देण्यात आला. तर दुसऱ्या स्थानावर इथिओपियाचा जेकब जेसारी हा राहिला. त्याने २ तास ९ मिनिटे ४३ सेकंदांची वेळ नोंदविली. महिला गटात केनियाच्या वेलेंटिन किपस्टर यांनी विजय मिळविला.
यामॅरेथॉनमध्ये सिनेतारकांसह, मुंबईचे डबेवाले, उद्योगपती, अबालवद्ध असे सर्वांनीच गारठा असूनही सहभाग घेतला होता. मॅरेथॉनमध्ये भारताच्या वैविध्यतेची जाणिवकरून देणारी पंजाबी, राजस्थानी इत्यादी गाण्यांवर नृत्यही सादर केले गेले. त्याचबरोबर देशात महिलांविरूद्धच्या अत्याचाराच्या निषेधार्थ सामाजिक अस्मितेचा संदेश देणारे फलक घेऊन स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.