जळगाव बॅटलर्स संघाने जॉन्सन टाइल्स करंडक महाराष्ट्र बुद्धिबळ लीगमध्ये अजिंक्यपद पटकाविले. त्यांनी अंतिम लढतीत ठाणे कॉम्बॅटन्ट्स संघावर ४-२ अशी मात केली व प्लेऑफ गटातील पराभवाचीही परतफेड केली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत जळगाव संघाकडून श्रीनाथ नारायणन, बी.अधिबन व ऋचा पुजारी यांनी शानदार विजय मिळविला तर प्रतीक पाटील व विदित गुजराथी यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध बरोबरी स्वीकारली. ठाणे संघाकडून प्रसन्ना राव याने एकमेव विजय मिळविला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अहमदनगर चेकर्सने मुंबई मूव्हर्सवर ३.५-२.५ अशी मात केली. स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून बी.अधिबन व पद्मिनी राऊत यांची निवड करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ जॉन्सन टाइल्स कंपनीचे उपमहाव्यवस्थापक (पश्चिम विभाग) अमितकुमार, मुख्य व्यवस्थापक विनय गच्चे, पुणे जिल्हा चेस सर्कलचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष रवींद्र डोंगरे यांच्या हस्ते
झाला.
सविस्तर निकाल-अंतिम लढत-जळगाव बॅटलर्स वि.वि. ठाणे कॉम्बॅटन्ट्स (४-२)-श्रीनाथ नारायणन वि.वि. तानिया सचदेव, बी.अधिबन वि.वि. एस.एल.नारायण, प्रतीक पाटील बरोबरी वि. विक्रमादित्य कुलकर्णी, के.मनीषा मोहंती पराभूत वि. प्रसन्ना राव, ऋचा पुजारी वि.वि. प्रणाली धारिया, विदित गुजराथी बरोबरी वि. अभिजित गुप्ता.
तिसऱ्या क्रमांकाची लढत-अहमदनगर चेकर्स वि.वि. मुंबई मूव्हर्स (३.५-२.५)-पद्मिनी राऊत बरोबरी वि.ईशा करवडे, शार्दूल गागरे बरोबरी वि. राकेश कुलकर्णी, तेजस बाक्रे बरोबरी वि.परिमार्जन नेगी, अभिषेक केळकर वि.वि. भक्ती कुलकर्णी, अभिजित कुंटे वि.वि. हिमांशु शर्मा, आकांक्षा हगवणे पराभूत वि. चिन्मय कुलकर्णी.