पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

भारतातील कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला असून दुखापतीतून सावरत असलेला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे अँडरसनला बांगलादेशच्या दौऱ्यालाही जाता आले नव्हते. त्यामुळे भारतातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने बांगलादेश दौऱ्यातील संघ कायम ठेवला आहे. ९ नोव्हेंबरपासून इंग्लंडच्या भारतीय दौऱ्याला राजकोट येथील कसोटी सामन्यापासून सुरुवात होणार आहे.

इंग्लंडचा संघ : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जाफर अन्सारी, जॉनी बेअरस्टो, जॅकी बॉल, गॅरी बॅलन्स, गॅरेथ बॅटी, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, बेन डुकेट, स्टीव्हन फिन, हसीब हमीद, आदिल रशिद, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.