श्रीलंकेच्या संघाचे आधारस्तंभ असलेले महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा मायभूमीतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. ‘‘इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सातवा आणि अखेरचा सामना माझा श्रीलंकेतील शेवटचा सामना असेल,’’ असे जयवर्धनेने ट्विटरवर म्हटले आहे. २०१५ विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत जयवर्धनेने दिले होते. विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार असल्याने जयवर्धनेला घरच्या मैदानात खेळण्याची ही शेवटची संधी आहे. कुमार संगकाराने काही दिवसांपूर्वीच आपल्या जन्मगावी अर्थात कॅण्डी येथे झालेल्या सामन्यानंतर विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोलंबो येथे होणारी लढत जयवर्धन-संगकारा जोडीसाठी मायदेशातील शेवटची लढत होणार आहे.