राष्ट्रकुल स्पर्धेत पाचव्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी पदकांचा ओघ कायम ठेवला असून नेमबाज गगन नारंगने ५० मी. शुटींग प्रकारात रौप्य पदाकाची कमाई केली, तर नेमबाज जीतू राय याने २५. मी पिस्तूल प्रकारात ‘सुवर्ण’ आणि गुरपाल सिंहने ‘रौप्य’ कामगिरी बजावली.
श्रेयसी सिंगचा रौप्यवेध
दरम्यान, चौथ्या दिवशीही भारतीय नेमबाजांची पदकापर्यंतची घोडदौड कायम होती. रविवारी श्रेयसी सिंग हिने महिलांच्या दुहेरी ट्रॅप प्रकारात रौप्यपदकाची कमाई करून दिली होती. आता गगन नारंगचे रौप्य, जीतू रायचे सुवर्ण आणि गुरपाल सिंहच्या रौप्य पदकाने नेमबाजी प्रकारात आणखी तीन पदकांची भर पडली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सतीश शिवलिंगमनेही आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपद मिळवून नव्या स्पर्धाविक्रमाला गवसणी घातली. वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या खात्यात ८ पदकं जमा झाली आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता एकूण ७ सुवर्ण, ११ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण २५ पदकं जमा झाली आहेत.