जपानचा युवा खेळाडू केई निशिकोरीने बार्सिलोना खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. निशिकोरीने स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझानवर ६-१, ६-२ असा विजय मिळवला. या दोघांदरम्यान याआधी झालेल्या लढतीत क्लिझाने बाजी मारली होती. अंतिम लढतीत त्याच्यासमोर डेव्हिड फेरर आणि पाब्लो अन्दूजार यांच्यातील विजेत्याचे आव्हान असणार आहे. निशिकोरीने पहिला सेट २८ मिनिटात नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये अन्दूजारने प्रतिकार केला. परंतु निशिकोरीने झंझावाती खेळ करत दुसऱ्या सेटसह सामनाही जिंकला.