क्रीडा संकुलाच्या निधीसाठी कुटुंबीयांचा निर्णय

ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडू आयुष्यभर संघर्ष करीत असतो. हे पदक केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर त्याच्या देशाकरिताही अतिशय अभिमानास्पद गोष्ट असते. मात्र आपल्या देशात पदक विजेत्यांची उपेक्षाच होत असते. त्याचा अभिनव पद्धतीने निषेध करण्यासाठी ऑलिम्पिक कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या कुटुंबीयांनी या पदकाचा लिलाव करण्याचे ठरवले आहे.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
ED seize property
सलग दुसऱ्या दिवशी विनोद खुटेच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच

याबाबत खाशाबा यांचे पुत्र रणजीत जाधव म्हणाले, ‘‘जळगाव येथे २००९ मध्ये खाशाबा जाधव करंडक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी तत्कालीन क्रीडामंत्री दिलीप देशमुख यांनी खाशाबांचे जन्मगावी राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल बांधण्याचे व तेथे अद्ययावत सुविधांनी युक्त अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली. या संकुलासाठी योग्य जागा मिळत नसल्यामुळे आमच्या कुटुंबीयांनी कऱ्हाड-तासगाव रस्त्यावरील २२ गुंठे जागा दिली. सुरुवातीला ही जागा अयोग्य असल्याची टीका करण्यात आली. मात्र नंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने ही जागा योग्य असल्याची शिफारस केली. २०१३ मध्ये या संकुलासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र एवढय़ा कमी खर्चात क्रीडा संकुल उभारणे शक्य नसल्यामुळे शासनाने काढलेल्या टेंडर नोटीसला प्रतिसाद आला नाही. त्यामुळे निधी मिळूनही हे संकुल अद्याप उभे राहिलेले नाही. संकुलासाठी अतिरिक्त निधी आम्ही खाशाबांचे पदक विकून उभारण्याचे ठरवले आहे. जर शासनाला हे संकुल उभे करावयाचे नसेल तर त्यांनी आमची जागा परत करावी.’’

  • ‘राज्य शासनातर्फे १९९७ पासून खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा आयोजित केली जात आहे. सुरुवातीला या स्पर्धेला राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा होता. त्यानंतर ही स्पर्धा राज्य स्तरावर आयोजित केली जाऊ लागली. २०१५ मध्ये या स्पर्धेच्या वेळी झालेल्या वादंगामुळे ही स्पर्धा बंद पडली आहे. याचाही निषेध करण्यासाठी आम्ही पदक विकायला काढले,’’ असेही रणजीत यांनी सांगितले.
  • ‘खाशाबा यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीचे कांस्यपदक मिळवत भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले होते. खाशाबा यांचे १९८४ मध्ये निधन झाले. तोपर्यंत त्यांचा कधीही गौरव झाला नाही. त्यांच्या निधनानंतर १६ वर्षांनी त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देण्यात आला. आपल्या देशात ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा योग्य मान राखला जात नाही,’’ असेही रणजीत यांनी सांगितले.