विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यानंतर डॅनियल व्हेटोरीने निवृत्ती पत्करल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले मिल्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

१४ वर्षांच्या कारकीर्दीत मिल्स जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत सातत्याने अव्वल दहा खेळाडूंमध्ये समाविष्ट असायचा. याचप्रमाणे बराच काळ तो अव्वल स्थानावर होता.
‘‘गेली १४ वर्षे देशाकडून खेळण्याचा बहुमान आणि आनंद मला मिळाला. पुढील आयुष्यात हीच उणीव मला आता भासणार आहे,’’ असे ३६ वर्षीय मिल्सने सांगितले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये व्हेटोरीपाठोपाठ (२९७) न्यूझीलंडकडून दुसऱ्या क्रमांकाचे बळी हे मिल्सच्या नावावर आहेत. मिल्सने तीन विश्वचषक स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केले आहे, परंतु यावेळी मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

प्रकार सामने डाव धावा सर्वोत्तम अर्धशतक बळी सर्वोत्तम ५ बळी
कसोटी १९ ३० २८९ ५७ १ ४४ ४/१६ ०
एकदिवसीय १७० १०१ १०४७ ५४ २ २४० ५/२५ १
ट्वेन्टी-२० ४२ १९ १३७ ३३* – ४३ ३/२६ ०
या अद्वितीय खेळाला अलविदा करण्याची ही योग्य वेळ आहे, याची मला खात्री पटली. माझ्या आवडत्या खेळासाठी मला समजून घेणाऱ्या माझ्या कुटुंबीयांना आता अधिक वेळ देता येईल.
– कायले मिल्स