राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहारात आरोपी असलेले ललित भानोत यांची भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. मात्र भानोत यांना अद्याप दोषी ठरविण्यात आलेले नसल्यामुळे त्यांची निवड गैर नाही, असे आयओएने म्हटले आहे. गैरव्यवहाराबाबत भानोत यांना एक वर्ष कारागृहात राहावे लागले होते. आयओएच्या त्रिसदस्यीय निवडणूक समितीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत भानोत यांचे नाव आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. अध्यक्षपदावर अभयसिंह चौताला यांचे प्रतिस्पर्धा रणधीरसिंग यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे चौताला यांची बिनविरोध निवड झाली आहे.