घरच्या मैदानावर आतापर्यंत सुवर्णपदकाचा दुष्काळ अनुभवणाऱ्या चीनला अखेर जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णबोहनी साजरी करता आली. लिऊ हाँगने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत हे विजेतेपद पटकावले. याचप्रमाणे डेकॅथलॉनमध्ये अमेरिकेच्या अ‍ॅश्टोन ईटोनने अजिंक्यपद राखले.
चालण्याच्या शर्यतीत लिऊ व तिची सहकारी लु झियुझी यांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक पटकावत कौतुकास्पद कामगिरी केली. लिऊने हे अंतर एक तास, २७ मिनिटे, ४५ सेकंदांत पार केले. झियुझीने तिच्या पाठोपाठ लगेचच ही शर्यत पूर्ण केली. युक्रेनच्या ल्युडमिला ओल्यानोवस्काने त्यांच्यानंतर २८ सेकंदांनी ही शर्यत पार करीत कांस्यपदकाची कमाई केली. फेलिक्स अ‍ॅलिसनने अमेरिकेच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. तिने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विजेतेपद मिळविले. तिने हे अंतर ४९.२६ सेकंदांत पार केले. शॉनी मिलर (बहामास) व शेरिका जॅक्सन (जमका) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. डेकॅथलॉनमध्ये सोनेरी कामगिरी करताना अ‍ॅश्टोनने ४,७०३ गुणांची कमाई केली. डॅमियन वॉर्नर (कॅनडा) व रिको फ्रीमुथ (जर्मनी) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. तिहेरी उडीत अमेरिकेच्या ख्रिस्तियन टेलरने सुवर्णपदक जिंकले. क्युबाच्या पेद्रो पिचर्डला रौप्यपदक मिळाले, तर पोर्तुगालचा नेल्सन इव्होरा कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

माझ्यावर खूप दडपण होते, मात्र ही शर्यत जिंक ण्याची मला खात्री होती. अर्थात शर्यतीच्या प्रारंभी मी व झियुझी आम्हा दोघींना झगडावे लागणार असे वाटले होते. मात्र कोही अंतर पार के ल्यानंतर आम्हाला चिवट लढत मिळण्याची शक्यता क मी आहे, हे लक्षात आल्यानंतर आमच्यावरील दडपण दूर झाले.
-लिऊ हाँग