* कोहलीच्या नाबाद ८५ धावा

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत निभ्रेळ यश मिळवल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतसुद्धा वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. धरमशाला येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ६ विकेट्सने दणदणीत विजय साजरा केला. भारतीय संघाने या विजयासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी बोहनी केली आहे. न्यूझीलंडला १९० धावांत रोखल्यानंतर भारतीय संघाकडून विराट कोहलीने नाबाद ८५ धावांची खेळी साकारून भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला. कोहलीने आपल्या भात्यातील सुरेख फटक्यांचा नजराणा पेश करत ९ चौकार आणि १ षटकार ठोकून नाबाद ८५ धावा केल्या. षटकार ठोकून कोहलीने सामन्यात भारतीय संघाच्या विजयाची नोंद केली.

सामन्याचा नाणेफेक भारतीय संघाने जिंकून धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी धोनीचा निर्णय योग्य ठरवून दाखवला.  भारतीय गोलंदाजांनी आज भेदक मारा करून किवींना दोनशेच्या आत रोखले. हार्दिक पंड्याने आपल्या एकदिवसीय पदापर्णात तीन विकेट्स घेतल्या, तर अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रानेही किवींच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. उमेश यादवने दोन गडी बाद केले.
न्यूझीलंडच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांसमोर त्रेधातिरपीट उडताना दिसली. किवींचा निम्मा संघ ४८ धावांतच तंबूत दाखल झाला होता. उमेश यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या माऱयावर किवी निष्प्रभ ठरले. त्यानंतर फिरकीपटूंनी कमाल केली. केदार जाधव या कामचलावू गोलंदाजाने दोन विकेट्स मिळवल्या. न्यूझीलंडची स्थिती ८ बाद १०८ अशी असताना गोलंदाज टीम साऊदीने यावेळी उल्लेखनीय फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. टीम साऊदीच्या अर्धशतकी साथीने टॉम लॅथमने नाबाद ७९ धावांची खेळी साकारली. या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला १९० धावांपर्यंत मजल मारता आली. टीम साऊदीने ४५ चेंडूत ५५ धावांची खेळी करून संघाची लाज राखली. खरंतर साऊदी देखील स्वस्तात माघारी परतणार होता. उमेश यादवने लाँग लेगवर टीम साऊदीचा झेल सोडून त्याला जीवनदान दिले आणि याचा पुरेपुर फायदा घेत साऊदीने एकदीवसीय क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले अर्धशतक गाठले. टीम साऊदीचे अर्धशतक आणि टॉम लॅथमच्या नाबाद ७९ धावांच्या जोरावर किवींना १९० धावा करता आल्या.

प्रत्युत्तरात भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे दमदार फलंदाजी करत चांगली सुरूवात केली. पण मिड ऑनला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित (१४) पायचीत झाला. तर रहाणे (३३) निष्काळजी फटका मारून यष्टीरक्षकाकरवी झेलबाद होऊ माघारी परतला. विराट कोहलीने विश्वासू फलंदाजी करत मनिष पांडेच्या साथीने भारतीय धावसंख्येला आकार दिला. मनिष पांडे ईश सोधीच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनी आणि कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी रचून विजयाच्या दिशेने कूच केली. विजयासाठी अवघ्या काही धावांची गरज असताना धोनी धावचीत झाला.

तत्पूर्वी, हार्दिक पंड्याने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले होते. पंड्याने गप्तिलला माघारी धाडले. त्यानंतर उमेश यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटक मारण्याच्या नादात कर्णधार केन विल्यमसन थर्ड मॅनवर झेल देऊन बसला. अमित मिश्राने विल्यमसनचा झेल टीपला. रॉस टेलर आल्यापावलीच माघारी परतला. त्यानंतर उमेश यादवने अँडरसनचा(४) अफलातून झेल टीपून भारतीय संघाला चौथ यश मिळवून दिले. ल्यूक राँची देखील शून्यावर बाद झाला आहे. हार्दिक पंड्याच्या यॉर्कर चेंडूवर राँची उमेश यादवला मिड ऑनवर झेल देऊन बसला. यानंतर ठराविक अंतराने किवींच्या विकेट्स गेल्या. अखेरच्या टप्प्यात फक्त लॅथमला साऊदीची चांगली साथ मिळाली.

 

Cricket Score of India vs New Zealand, संपर्ण सामन्याचे अपडेट्स –

Live Updates
19:51 (IST) 16 Oct 2016
विराट कोहलीचा शानदार षटकार आणि भारताने सामना ६ विकेट्सने जिंकला
19:50 (IST) 16 Oct 2016
३३ षटकांच्या अखेरीस भारत १८८/४ (कोहली- ८३ , जाधव- ६ )
19:49 (IST) 16 Oct 2016
केदार जाधवचा चौकार, भारत ४ बाद १८८
19:49 (IST) 16 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी केवळ ७ धावांची गरज
19:48 (IST) 16 Oct 2016
केदार जाधवला जीवनदान
19:48 (IST) 16 Oct 2016
केदार जाधवचा झेल टीपल्याची यष्टीरक्षक ल्यूक राँचीची अपील, पण पंचांचा नकार
19:45 (IST) 16 Oct 2016
केदार जाधवचा थर्ड मॅनच्या दिशेने चौकार, भारत ४ बाद १८१
19:44 (IST) 16 Oct 2016
कोहलीचा आणखी एक चौकार, भारत ४ बाद १७६
19:44 (IST) 16 Oct 2016
३१ व्या षटकात केवळ १ धाव, भारत ४ बाद १७१
19:41 (IST) 16 Oct 2016
३० षटकांच्या अखेरीस भारत १७०/४ , विजयासाठी केवळ २१ धावांची गरज
19:39 (IST) 16 Oct 2016
कोहलीचा कव्हर्सच्या दिशेने चौकार, भारत ४ बाद १६८ धावा
19:37 (IST) 16 Oct 2016
विराट कोहलीचा सुंदर कव्हर ड्राईव्ह आणि न्यूझीलंडच्या खेळाडूकडून तितकेच सुंदर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण
19:36 (IST) 16 Oct 2016
भारतीय संघ विजयापासून केवळ २९ धावा दूर
19:36 (IST) 16 Oct 2016
धोनी बाद झाल्यानंतर केदार जाधव फलंदाजीसाठी मैदानात दाखल
19:32 (IST) 16 Oct 2016
धोनी २१ धावा करून माघारी, भारत ४ बाद १६२ धावा
19:31 (IST) 16 Oct 2016
विराट आणि धोनीमध्ये धाव घेताना विसंवाद, धोनी धावचीत
19:26 (IST) 16 Oct 2016
विराट कोहली आणि धोनीची अर्धशतकी भागीदारी
19:26 (IST) 16 Oct 2016
विराट कोहलीचा झेल टीपण्याची टीम साऊदीला संधी, पण अपयश
19:25 (IST) 16 Oct 2016
विराट कोहलीचा अप्पर कट चौकार, भारत ३ बाद १५८
19:25 (IST) 16 Oct 2016
कोहलीचा डीप मिड विकेटच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद १५४
19:24 (IST) 16 Oct 2016
२७ षटकांच्याअंती भारत १५०/३ (कोहली- ५२ , धोनी- २० )
19:19 (IST) 16 Oct 2016
विराट कोहलीचे ३७ वे एकदिवसीय अर्धशतक
19:19 (IST) 16 Oct 2016
विराट कोहलीचे शानदार अर्धशतक, भारत ३ बाद १४५ धावा
19:17 (IST) 16 Oct 2016
धोनीचा पॉईंट्चा दिशेने चौकार, भारत ३ बाद १४१ धावा
19:16 (IST) 16 Oct 2016
२५ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद १३७ धावा. (कोहली- ४७ , धोनी- १२ )
19:13 (IST) 16 Oct 2016
धोनीचा पूल शॉट उत्तुंग षटकार, भारत ३ बाद १३५ धावा
19:09 (IST) 16 Oct 2016
विराट कोहलीचा मिड ऑनच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद १२७ धावा
19:08 (IST) 16 Oct 2016
२३ व्या षटकात चार धावा, भारत १२३/३ (कोहली- ४१, धोनी- ५ )
18:59 (IST) 16 Oct 2016
कोहीलचा शानदार कव्हर ड्राईव्ह, २१ व्या षटकात ११ धावा. भारत ३ बाद ११८ धावा
18:58 (IST) 16 Oct 2016
विराट कोहलीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा शानदार स्ट्रेट ड्राईव्ह
18:54 (IST) 16 Oct 2016
२० षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद १०७ धावा. (कोहली- २७, धोनी- १ )
18:53 (IST) 16 Oct 2016
कोहलीकडून शानदार फटका, पण सीमारेषेवर सँटनरकडून उल्लेखनीय क्षेत्ररक्षण
18:53 (IST) 16 Oct 2016
मनिष पांडे बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी मैदानात
18:50 (IST) 16 Oct 2016
भारतीय संघाची तिसरी विकेट, मनिष पांडे झेलबाद; इश सोधी घेतली विकेट
18:48 (IST) 16 Oct 2016
१९ व्या षटकात भारताच्या धावसंख्येचे शतक, भारतीय संघाला विजयासाठी केवळ ९१ धावांची गरज
18:46 (IST) 16 Oct 2016
मनिष पांडेचा मिड ऑनच्या दिशेने फटका, सीमारेषेवर किवींकडून शानदार क्षेत्ररक्षण
18:44 (IST) 16 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी केवळ ९२ धावांची गरज
18:43 (IST) 16 Oct 2016
मनिष पांडे आणि विराट कोहली यांची संयमी फलंदाजी, १८ षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या १ बाद ९२
18:36 (IST) 16 Oct 2016
१६ षटकांच्या अखेरीस भारत ८४/२
18:34 (IST) 16 Oct 2016
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत बदल, फिरकीपटू इश सोधीला पाचारण
18:30 (IST) 16 Oct 2016
१५ षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या २ बाद ८० (कोहली- १६ , मनिष- ५ )
18:27 (IST) 16 Oct 2016
कोरे अँडरसनचे सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षण
18:26 (IST) 16 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ११४ धावांची गरज
18:25 (IST) 16 Oct 2016
१४ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद ७७ धावा. (कोहली- १३ , मनिष- ५ )
18:25 (IST) 16 Oct 2016
विराट कोहलीचा मिड विकेटच्या दिशेने फटका, दोन धावा
18:22 (IST) 16 Oct 2016
कोहलीचा मिड विकेट आणि मिड ऑनच्यामधून शानदार चौकार
18:21 (IST) 16 Oct 2016
१३ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद ६७ धावा. (कोहली-५ , मनिष-४ )
18:19 (IST) 16 Oct 2016
मनिष पांडेचा कव्हर्सच्यावरून चौकार, भारत २ बाद ६७ धावा
18:18 (IST) 16 Oct 2016
अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर युवा फलंदाज मनिष पांडे मैदानात दाखल
18:16 (IST) 16 Oct 2016
अजिंक्य रहाणे ३३ धावा करून माघारी, भारत २ बाद ६२ धावा