इंग्लंडच्या ५६९ धावांच्या डोंगरासमोर भारतीय संघाने ३३० धावांवर गुडघे टेकले. इंग्लंडचा कर्णधार अलिस्टर कुकने भारताला फॉलोऑन न देता भक्कम आघाडीचा फायदा उचलण्याचे ठरविले आणि फलंदाजी स्विकारली आहे.
मंगळवारी तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ३२३ अशी अवस्था असलेल्या भारतीय संघाचे उर्वरित दोन फलंदाज बुधवारी चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला त्वरित तंबूत परतले आणि इंग्लंडला दोनशेहून अधिक धावांची भक्कम आघाडी मिळाली. त्यामुळे या आघाडी फायदा घेत इंग्लंडने फॉलोऑन न देता फलंदाजी स्विकारली. मैदानावर सध्या इंग्लंडची सलमी जोडी फलंदाजी करत असून २५३ धावांची आघाडी इंग्लंडकडे आहे. त्यामुळे आज दिवसभरात भारतीय गोलंदाजांना भेदक मारा करून इंग्लंड फलंदाजांना त्वरित गुंडाळावे लागणार आहे.