मोहालीमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सने दणदणीत विजय साजरा केला. विराट कोहलीच्या नाबाद १५४ धावांच्या जोरावर न्यूझीलंडच्या २८६ धावांच्या खडतर आव्हानाचा भारतीय संघाने यशस्वी पाठलाग करत विजयाची नोंद केली. भारतीय संघाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
मोहालीच्या स्टेडियमवर आज कोहलीच्या नजाकती फटक्यांची आतषबाजी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ८० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. किवींच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. अजिंक्य रहाणे (५) हेन्रीच्या गोलंदाजीवर स्वस्तात झेलबाद झाला, तर रोहित शर्मा देखील १३ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. संघाची सलामी जोडी स्वस्तात तंबूत दाखल झाल्यानंतर कर्णधार धोनीने मैदानात येण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. धोनीने संयमी सुरूवात करून कोहलीला चांगली साथ देण्यास सुरूवात केली. हळूहळू दोघांनीही मैदानात जम बसविण्यास सुरूवात केल्यानंतर दोघांची भागीदारी फुलत गेली. धोनी आणि कोहली यांनी तिसऱया विकेटसाठी तब्बल १५१ धावांची भागीदारी रचली. धोनी ८० धावांवर झेलबाद झाला. पण त्यावेळी भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. कोहलीने भारतीय संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आपले २६ वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक साजरे केले. सामन्याच्या अखेरपर्यंत मैदानात राहून कोहलीने भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला. ४९ व्या षटकात कोहलीने ट्रेंट बोल्टची जोरदार धुलाई केली. बोल्टच्या षटकात २२ धावा वसुल केल्यानंतर मनिष पांडेने अखेरच्या षटकात मिड ऑनवर चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले. पांडेने नाबाद २८ धावा केल्या. विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

तत्पूर्वी, भारतीय संघाने या सामन्यात पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने भारत दौऱयात तब्बल सातव्यांदा नाणेफेकीचा कौल गमावला. न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात चांगली झाली होती. गप्तीलने आक्रमक रुप धारण केले होते. त्यामुळे सलामीजोडी फोडण्याची गरज असताना उमेश यादवने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. यादवने गप्तीलला(२७) पायचीत केले. त्यानंतर केन विल्यमसन आणि लॅथम यांनी संयमी फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरूवात केली. दोघांनीही मैदानात जम बसविण्यास सुरूवात केली होती. भारतीय संघाला विकेटची नितांत गरज असताना भारतीय संघाचा कामचलावू गोलंदाज केदार जाधवने भारतीय संघाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. केदार जाधवने विल्यमसनला(२२) पायचीत केले.

रॉस टेलर सुरूवातीला चाचपडताना दिसला पण खेळपट्टीचा नूर ओळखल्यानंतर टेलरच्या फलंदाजीला बहर आला. रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. टेलर आणि लॅथम मैदानात असताना न्यूझीलंडच्या धावसंख्येची सरासरी पाहता संघ तीनशेचा आकडा गाठेल असा अंदाज होता. किवी सामन्यावर पकड निर्माण करत असल्याचे दिसत असताना अमित मिश्राने रॉस टेलरला(४४) बाद केले. धोनीने अफलातून स्टम्पिंग करून टेलरला माघारी धाडले. टेलर बाद झाल्यानंतर केदार जाधवने पुन्हा एकदा भारतीय संघाला यश मिळवून दिले. अँडरसन मोठा फटका मारण्याच्या नादात स्वस्तात झेल बाद झाला. त्यानंतर राँचीला देखील धोनीने स्टम्पिंग करून माघारी धाडले आणि सामन्याच्या ३० व्या षटकात भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. १५३ धावांवर ३ विकेट असणाऱया न्यूझीलंडची स्थिती ७ बाद १८० धावा अशी झाली. न्यूझीलंडची आठवी विकेट देखील स्वस्तात पडली. पण जेम्स नीशाम आणि मॅट हेन्री जोडी संघासाठी तारणहार ठरली. दोघांनी नवव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचून संघाला २५० चा आकडा गाठून दिला. जेम्स निशामने ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर हेन्रीने ३९ धावांवर नाबाद राहिला. अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडची शेवटची विकेट पडली. किवींनी भारतीय संघासमोर विजयासाठी २८६ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाकडून केदार जाधव आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर बुमराह आणि मिश्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.

India vs New Zealand : दिवसभरातील अपडेट्स

Live Updates
21:20 (IST) 23 Oct 2016
पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची २-१ अशी आघाडी
21:19 (IST) 23 Oct 2016
विराट कोहलीची नाबाद १५४ धावांची खेळी
21:19 (IST) 23 Oct 2016
मनिष पांडेचा चौकार आणि भारतीय संघाचा न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय
21:18 (IST) 23 Oct 2016
भारतीय संघाला १२ चेंडूत केवळ १ धावेची गरज
21:18 (IST) 23 Oct 2016
कोहलीने १५० धावांचा टप्पा गाठला
21:18 (IST) 23 Oct 2016
कोहलीचा शानदार कव्हर ड्राईव्ह, ट्रेंट बोल्टच्या षटकात कोहलीने कुटल्या २२ धावा
21:17 (IST) 23 Oct 2016
कोहलीचा ट्रेंट बोल्टला षटकार, भारताला विजयासाठी केवळ ७ धावांची गरज
21:16 (IST) 23 Oct 2016
कोहलीचा मिड ऑफच्यावरून चौकार, भारतीय संघाला विजयासाठी केवळ १३ धावांची गरज
21:15 (IST) 23 Oct 2016
दुसऱया चेंडूवर कोहलीच्या दोन धावा
21:14 (IST) 23 Oct 2016
ट्रेंट बोल्टच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीचा चौकार, भारताला विजयासाठी १७ चेंडूत १९ धावांची गरज
21:13 (IST) 23 Oct 2016
४७ व्या षटकात पाच धावा, भारतीय संघाला विजायासाठी १८ चेंडूत २३ धावांची गरज
21:11 (IST) 23 Oct 2016
४७ व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंमध्ये तीन धावा
21:09 (IST) 23 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी २४ चेंडूत २८ धावांची गरज
21:09 (IST) 23 Oct 2016
कोहलीचा थर्ड मॅनच्या दिशेने फटका, एक धाव
21:08 (IST) 23 Oct 2016
कोहलीचा शानदार कव्हर ड्राईव्ह चौकार, भारत ३ बाद २५७
21:06 (IST) 23 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी २८ चेंडूत ३६ धावांची गरज
21:05 (IST) 23 Oct 2016
४५ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद २५१ धावा. (कोहली- १२२ , पांडे-२२)
21:04 (IST) 23 Oct 2016
भारतीय संघाने २५० धावांचा टप्पा गाठला
21:01 (IST) 23 Oct 2016
मिड ऑफवर फटका , एक धाव
21:00 (IST) 23 Oct 2016
कोहली स्ट्राईकवर
21:00 (IST) 23 Oct 2016
पहिल्या चेंडूवर एक धाव
21:00 (IST) 23 Oct 2016
मनिष पांडे स्ट्राईकवर, गोलंदाजी करतोय टीम साऊदी
20:59 (IST) 23 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ३६ चेंडूत ४१ धावांची गरज
20:57 (IST) 23 Oct 2016
कोहली आणि पांडेची अर्धशतकी भागीदारी
20:57 (IST) 23 Oct 2016
विराट कोहलीचा कव्हर्सच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद २४३ धावा
20:55 (IST) 23 Oct 2016
४३ व्या षटकात ६ धावा, भारत ३ बाद २३७ धावा. विजयासाठी ४२ चेंडूत ४९ धावांची गरज
20:54 (IST) 23 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ४३ चेंडूत ५० धावांची गरज
20:50 (IST) 23 Oct 2016
४२ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद २३१ धावा. (कोहली- १०७ , पांडे- १७ )
20:49 (IST) 23 Oct 2016
मनिष पांडेचा थर्ड मॅनच्या दिशेने हवेत फटका, पण एकच धाव
20:48 (IST) 23 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ५१ चेंडूत ५९ धावांची गरज
20:48 (IST) 23 Oct 2016
कोहलीचा थर्ड मॅनच्या दिशेने सुंदर फ्लिक आणि चौकार
20:44 (IST) 23 Oct 2016
मनिष पांडेचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार, भारत ३ बाद २१८ धावा
20:42 (IST) 23 Oct 2016
विराट कोहलीचे २६ वे एकदिवसीय शतक
20:41 (IST) 23 Oct 2016
कोहली खेळतोय ९९ धावांवर, कोरे अँडरसन करतोय गोलंदाजी
20:40 (IST) 23 Oct 2016
फाईन लेगच्या दिशेने कोहलीचा शानदार चौकार
20:39 (IST) 23 Oct 2016
कोहलीचा पॉईंटच्या दिशेने फटका, दोन धावा
20:36 (IST) 23 Oct 2016
३९ व्या षटकात केवळ दोन धावा, भारत ३ बाद २०४ धावा
20:33 (IST) 23 Oct 2016
३८ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद २०२ धावा, भारत विजयापासून ८४ धावा दूर
20:32 (IST) 23 Oct 2016
भारतीय संघाच्या धावसंख्येने २०० चा आकडा गाठला, विजयासाठी ८६ धावांची गरज
20:30 (IST) 23 Oct 2016
मनिष पांडेचा गोलंदाजाच्या डोक्यावर पूल शॉट चौकार
20:30 (IST) 23 Oct 2016
विराट कोहलीचा थर्ड मॅनच्या दिशेने फ्लिक, पण एकच धाव
20:29 (IST) 23 Oct 2016
३७ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद १९३ धावा. (कोहली- ८८ , पांडे- ०)
20:28 (IST) 23 Oct 2016
धोनी बाद झाल्यानंतर मनिष पांडे फलंदाजीसाठी मैदानात दाखल
20:28 (IST) 23 Oct 2016
कोहली आणि धोनीने रचली १५१ धावांची भागीदारी
20:27 (IST) 23 Oct 2016
कोहली आणि धोनीची जोडी फोडण्यात न्यूझीलंडचा यश, धोनी ८० धावांवर झेलबाद
20:23 (IST) 23 Oct 2016
कोहली आणि धोनीची १६५ धावांची भागीदारी
20:22 (IST) 23 Oct 2016
धोनीकडून स्ट्रेट ड्राईव्ह चौकार, भारत २ बाद १९२ धावा.
20:20 (IST) 23 Oct 2016
३५ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद १८७ धावा, विजयासाठी ९९ धावांची गरज
20:14 (IST) 23 Oct 2016
कोहलीचा डीप मिड विकेटवर शानदार चौकार, भारत २ बाद १८३ धावा
20:13 (IST) 23 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी १०० चेंडूत १०७ धावांची गरज