घरच्या मैदानात मालिका विजयाचा मानाचा तुरा शिरपेचात खोवण्याची सुवर्णसंधी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने गमावली आहे. रांची येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला १९ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. न्यूझीलंडच्या २६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाचा डाव २४१ धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक ५७ धावांची खेळी साकारली, तर विराट कोहलीने ४५ धावा केल्या. किवींकडून टीम साऊदीने तीन विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्ट आणि नीशाम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. न्यूझीलंडने या विजयासाठी पाच सामन्यांच्या मालिकेत आता २-२ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे पाचवा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.

न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघासमोर विजयासाठी २६१ धावांचे आव्हान ठेवले होते. किवींच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात तशी चांगली झाली होती. रोहित आणि रहाणे संयमी फलंदाजी करत असताना रोहितने ११ धावांवर आपली विकेट टाकली. त्यानंतर रहाणे आणि कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱया विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचली. रहाणे याने आपल्या नजाकती फटक्यांनी स्टेडियमच्या चारही बाजूंना दमदार फटके मारले आणि आपले १६ वे अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघ सामन्यावर पकड निर्माण करत असतानाच विराट कोहली (४५) धावांवर झेलबाद झाला. ईश सोधीने कोहलीची विकेट घेतली. मग रहाणे देखील ५७ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. धोनी यावेळी मॅच विनिंग खेळी साकारण्यात अपयशी ठरला. धोनीने तब्बल ३१ चेंडूत केवळ ११ धावा केल्या. धोनी क्लीनबोल्ड होऊन माघारी परतला. त्यानंतर भारतीय संघाचा डाव गडगडला. अक्षर पटेल याने ३८ धावांचे योगदान देऊन सामना जिवंत ठेवला होता. पण ठराविक अंतराने भारताचे एकामागोमाग एक विकेट्स पडत गेले आणि भारतीय संघाला १९ धावांनी पराभव पत्करावा लागला.

तत्पूर्वी, सामन्याचा नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय स्विकारली होता. न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात दमदार झाली होती. मार्टीन गप्तील आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेल याने सामन्याच्या १६ व्या षटकात पहिले यश मिळवून दिले. लॅथम ३९ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर विल्यमसन आणि गप्तील यांनी संयमी खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. न्यूझीलंडकडून मार्टीन गप्तील याने यावेळी सर्वाधिक ७२ धावांची खेळी साकारली. तर केन विल्यमसन याने ४१ धावा केल्या. भारतीय संघाकडून अमित मिश्रा याने दोन विकेट् घेतल्या, तर उमेश यादव, धवल कुलकर्णी, हार्दीक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सामन्याच्या २६  व्या षटकात हार्दीक पंड्या पुन्हा एकदा भारतीय संघासाठी तारणहार ठरला. पंड्याने मार्टीन गप्तील याला ७२ धावांवर धोनीकरवी झेलबाद केले. यानंतर अमित मिश्रा याने आपली फिरकी जादू दाखवत किवींच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. किवींच्या चार विकेट पडल्यानंतर भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या धावसंख्येला चांगला लगाम घातला. ५० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड संघाला २६० धावांवर समाधान मानावे लागले.

 

India vs New Zealand: दिवसभरातील अपडेट्स

Live Updates
21:21 (IST) 26 Oct 2016
रांची येथील सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली
21:21 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाकडून शेवटच्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी
21:19 (IST) 26 Oct 2016
चौथा सामना न्यूझीलंडने १९ धावांनी जिंकला, भारतीय संघाला डाव २४१ धावांत संपुष्टात
21:18 (IST) 26 Oct 2016
तिसऱया चेंडूवर आणखी एक धाव, भारतीय संघाला विजयासाठी २० धावांची गरज
21:17 (IST) 26 Oct 2016
दुसऱया चेंडूवर लाँग ऑफवर एक धाव
21:17 (IST) 26 Oct 2016
ट्रेंट बोल्टच्या पहिल्या चेंडूवर पॉईंटच्या दिशेने एक धाव
21:16 (IST) 26 Oct 2016
शेवटच्या १२ चेंडूत भारतीय संघाला २३ धावांची गरज
21:15 (IST) 26 Oct 2016
टीम साऊदीच्या पहिल्या पाच चेंडूत तीन धावा
21:11 (IST) 26 Oct 2016
४८ वे षटक टाकतोय टीम साऊदी
21:10 (IST) 26 Oct 2016
धवल कुलकर्णीचा पॉईंटच्या दिशेने खणखणीत चौकार, भारताला विजयासाठी २७ धावांची गरज
21:08 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी २० चेंडूत ३२ धावांची गरज
21:08 (IST) 26 Oct 2016
तिसऱया चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव
21:07 (IST) 26 Oct 2016
ट्रेंट बोल्ट टाकतोय ४७ वे षटक, पहिले दोन चेंडू निर्धाव
21:05 (IST) 26 Oct 2016
शेवटच्या चार षटकांचा खेळ शिल्लक, भारताला विजयासाठी ३५ धावांची गरज
21:05 (IST) 26 Oct 2016
४६ व्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि डॉट बॉल
21:04 (IST) 26 Oct 2016
धवल कुलकर्णीचा स्वेअर ड्राईव्ह चौकार, भारत ९ बाद २२६ धावा
21:04 (IST) 26 Oct 2016
सँटनरच्या पहिल्या चार चेंडूंमध्ये तीन धावा
21:01 (IST) 26 Oct 2016
४५ षटकांच्या अखेरीस भारत ९ बाद २१९ धावा.
21:00 (IST) 26 Oct 2016
धवल कुलकर्णीचा जोरदार फटका, दोन धावा
21:00 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ३२ धावांत ४५ धावांची गरज
20:59 (IST) 26 Oct 2016
धवल कुलकर्णीचा उत्तुंग षटकार, भारत ९ बाद २१६ धावा
20:58 (IST) 26 Oct 2016
४४ व्या षटकात केवळ तीन धावा, भारत ९ बाद २१०
20:56 (IST) 26 Oct 2016
उमेश यादवचा स्विप फटका, एक धाव
20:56 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ४२ चेंडूत ५४ धावांची गरज
20:55 (IST) 26 Oct 2016
४३ षटकांच्या अखेरीस भारत ९ बाद २०७ धावा.
20:53 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाचा शेवटचा फलंदाजी मैदानात, विजयासाठी ४५ चेंडूत ५४ धावांची गरज
20:53 (IST) 26 Oct 2016
ट्रेंट बोल्टने घेतली अक्षर पटेलची विकेट
20:53 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाला मोठा धक्का, अक्षर पटेल क्लीन बोल्ड
20:50 (IST) 26 Oct 2016
भारताला विजयासाठी ४७ चेंडूत ५६ धावांची गरज
20:49 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाची आठवी विकेट, दोन धावा घेताना मिश्रा आणि अक्षर यांच्या विसंवाद
20:48 (IST) 26 Oct 2016
दोन धावा घेण्याच्या नादात अमित मिश्रा धावचीत
20:47 (IST) 26 Oct 2016
४२ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद २०४ धावा
20:45 (IST) 26 Oct 2016
अक्षर पटेलकडून शानदार षटकार, भारत ७ बाद २०३ धावा
20:44 (IST) 26 Oct 2016
दुसऱया चेंडूवर अमित मिश्राचा कव्हर ड्राईव्ह, एक धाव
20:43 (IST) 26 Oct 2016
४२ व्या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव
20:42 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ५४ चेंडूत ६६ धावांची गरज
20:42 (IST) 26 Oct 2016
४१ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद १९५ धावा.
20:40 (IST) 26 Oct 2016
अमित मिश्राचा स्विप शॉट, दोन धावा
20:39 (IST) 26 Oct 2016
दुसऱया चेंडूवर अक्षर पटेलकडून १ धाव
20:39 (IST) 26 Oct 2016
४१ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अमित मिश्राकडून १ धाव
20:38 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ६० चेंडूत ७२ धावांची गरज
20:37 (IST) 26 Oct 2016
अमित मिश्राचा डीप मिड विकेटवर शानदार चौकार, भारत ७ बाद १८९ धावा.
20:35 (IST) 26 Oct 2016
अक्षरकडून थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव
20:35 (IST) 26 Oct 2016
अक्षर पटेलचा शानदार स्वेअर ड्राईव्ह चौकार
20:33 (IST) 26 Oct 2016
३९ व्या षटकात केवळ तीन धावा, भारतीय संघाला विजयासाठी ८२ धावांची गरज
20:29 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ७२ चेंडूत ८५ धावांची गरज
20:28 (IST) 26 Oct 2016
३८ व्या षटकात पाच धावा, भारत ७ बाद १७६ धावा.
20:24 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ७८ चेंडूत ९० धावांची गरज
20:23 (IST) 26 Oct 2016
३७ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद १७१ धावा. (अक्षर- १७, मिश्रा-२)
20:18 (IST) 26 Oct 2016
भारतीय संघाची सातवी विकेट, हार्दीक पंड्या झेलबाद