कानपूर कसोटीत तिसऱया दिवशी भारतीय संघाने पुनरागमन केले असून, न्यूझीलंडवर २१५ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाची दुसऱया डावात १ बाद १५९ अशी धावसंख्या आहे. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी शतकी भागीदारी रचून भारताच्या धावसंख्येला भक्कम आघाडी मिळवून देण्याचे काम केले आहे. आजच्या दिवसाअखेरीस पुजारा नाबाद ५० , तर मुरली विजय नाबाद ६५ धावांवर खेळत आहेत. लोकेश राहुल ३२ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुजारा आणि विजय यांनी डाव सावरला.

आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात फिरकीला पोषक असणाऱ्या कानपूरच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी शनिवारी आपली जादू दाखविली. न्यूझीलंडचे फलंदाज आर. अश्विन व जडेजाच्या फिरकीच्या सापळ्यात अडकताना दिसले. न्यूझीलंडचा पहिला डाव २६२ धावांतच संपुष्टात आला. आर.अश्विनने चार, रवींद्र जडेजाने सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. तिसऱया दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरूवात चांगली झाली. अश्विनने टॉम लॅथमला ५८ धावांवर पायचीत बाद करून लॅथम-विल्यमसन जोडी फोडली. आर.  त्यानंतर पुढच्याच षटकात जडेजाने रॉस टेलरला शून्यावर बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. अश्विनने पुढे विल्यमसनला (७५) त्रिफळाचीत केले आणि भारतीय संघाला चौथे यश मिळवून दिले. यापुढे सामन्यात भारतीय संघाने फिरकीपटूंच्या जोरावर पुनरागमन केले. रवींद्र जडेजाने एकाच षटकात तीन विकेट्स घेऊन न्यूझीलंडला गारद केले. किवींचा पहिला डाव २६२ धावांत संपुष्टात आला, त्यामुळे भारतीय संघाला ५६ धावांची आघाडी मिळाली.

कालचा दिवस भारतीय संघासाठी फारसा आश्वासक ठरला नव्हता. कर्णधार केन विल्यम्सन आणि टॉम लॅथम यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत शतकी भागीदारी रचली होती. पण दुसऱया दिवसाच्या तिसरा सत्राचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या सत्रापर्यंत न्यूझीलंडला १ बाद १५२ अशी मजल मारला आली. भारतीय संघाचा ३१८ धावांचा पाठलाग करणारा न्यूजीलंडचा संघ दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा केवळ १६६ धावांनी पिछाडीवर होता. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीवर टॉम लॅथम यांनी मैदानात चांगलाच जम बसवला होता. दोघांनीही अर्धशतकी खेळी साकारली असून, दुसऱया दिवसाचा खेळ थांबविण्यात आला तेव्हा विल्यमसन ६५ धावांवर, तर लॅथम ५६ धावांवर खेळत होते.

India vs New Zealand: दिवसभरातील अपडेट्स –  

Live Updates
16:47 (IST) 24 Sep 2016
तिसऱया दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाकडे २१५ धावांची आघाडी
16:46 (IST) 24 Sep 2016
तिसऱया दिवसाचा खेळ संपला, भारत १ बाद १५९ धावा. ( मुरली विजय- ६४, चेतेश्वर पुजारा- ५० )
16:45 (IST) 24 Sep 2016
चेतेश्वर पुजाराचे कसोटी क्रिकेटमधील ९ वे अर्धशतक
16:45 (IST) 24 Sep 2016
चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक पूर्ण, भारत १ बाद १५६ धावा.
16:44 (IST) 24 Sep 2016
पहिल्या दोन चेंडूंवर दोन धावा
16:44 (IST) 24 Sep 2016
आजच्या दिवसाचे अखेरचे षटक
16:43 (IST) 24 Sep 2016
४६ षटकांनंतर भारत १ बाद १५५ धावा. (पुजारा- ४९, विजय- ६३)
16:39 (IST) 24 Sep 2016
पुजारा आणि मुरली विजय यांची शतकी भागीदारी, भारत मजबूत स्थितीत
16:39 (IST) 24 Sep 2016
पुजाराचा स्वेअर लेगच्या दिशेने चौकार, भारत १५३/१
16:36 (IST) 24 Sep 2016
४५ वे षटक निर्धाव, भारत १४९/१
16:36 (IST) 24 Sep 2016
पुजारा, विजयची संयमी फलंदाजी
16:33 (IST) 24 Sep 2016
४४ व्या षटकानंतर भारत १ बाद १४९ (पुजारा- ४३ , विजय- ६३ )
16:23 (IST) 24 Sep 2016
खेळपट्टीवर चेंडूला चांगली फिरकी मिळायला लागली, ईश सोधीकडून चांगली गोलंदाजी
16:20 (IST) 24 Sep 2016
भारतीय संघाकडे २०० धावांची आघाडी, दुसऱया डावात भारत १ बाद १४६ (पुजारा- ४२ , विजय- ६१ )
16:17 (IST) 24 Sep 2016
४० षटकांच्या अखेरीस भारत १ बाद १४३ धावा.
16:05 (IST) 24 Sep 2016
पुढच्याच चेंडूवर पुजाराकडून फाईन गेलच्या दिशेने चौकार, भारत १ बाद १३४
16:04 (IST) 24 Sep 2016
पुजाराच्या बॅटला चेंडूचा स्पर्श नाही, पंचांचा निर्णय ठरला योग्य
16:04 (IST) 24 Sep 2016
पुजाराचा झेल यष्टीरक्षकाने टीपल्याची अपील, पंचांचा नकार
16:03 (IST) 24 Sep 2016
मुरली विजय आणि पुजाराची जोडी फोडण्यासाठी वँगरकडून बाऊन्सरचे अस्त्र, पण भारतीय फलंदाजांचा सावध पवित्रा
16:01 (IST) 24 Sep 2016
भारतीय संघ सध्या ३.६० च्या सरासरीने धावा करत असून, संघाकडे १९० धावांची आघाडी आहे
15:49 (IST) 24 Sep 2016
पुजारा आणि मुरली विजयची ८९ चेंडूत ७५ धावांची भागीदारी
15:43 (IST) 24 Sep 2016
चेतेश्वर पुजाराचा चौकार, भारत १ बाद १२४
15:39 (IST) 24 Sep 2016
चेतेश्वर पुजाराचा लाँग ऑफच्या दिशेने चौकार, भारत १ बाद ११५ धावा
15:39 (IST) 24 Sep 2016
मुरली विजयचे अर्धशतक पूर्ण, भारतीय संघाकडे १७० धावांची आघाडी
15:36 (IST) 24 Sep 2016
भारत १ बाद ११३ धावा, सध्या भारतीय संघाकडे १६९ धावांची आघाडी
15:21 (IST) 24 Sep 2016
पुजारा आणि मुरली विजयची अर्धशतकी भागीदारी
15:20 (IST) 24 Sep 2016
ट्रेंट बोल्टला मुरली विजयचा फाईन लेगच्या दिशेने चौकार, भारत १ बाद ९९ धावा
15:19 (IST) 24 Sep 2016
मुरली विजयने ४० धावांचा टप्पा ओलांडला
15:14 (IST) 24 Sep 2016
सँटनरच्या गोलंदाजीवर मुरली विजयचा आणखी एक बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चौकार
15:14 (IST) 24 Sep 2016
मुरली विजयचा फाईन गेलच्या दिशेने फटका, दोन धावा. भारत १ बाद ९४
15:12 (IST) 24 Sep 2016
मुरली विजयचा एक्ट्रा कव्हर्सच्या दिशेने नजाकती फटका, चौकार
15:11 (IST) 24 Sep 2016
२५ षटकांनंतर भारतीय संघाच्या ८८/१ धावा, १४३ धावांची आघाडी
15:03 (IST) 24 Sep 2016
चेतेश्वर पुजारा सध्या आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे, पुजाराच्या १३ चेंडूत २० धावा
15:01 (IST) 24 Sep 2016
भारतीय संघ १४२ धावांनी आघाडीवर
15:01 (IST) 24 Sep 2016
थर्ड मॅनच्या दिशेने पुजाराचा शानदार शॉट, चौकार
14:55 (IST) 24 Sep 2016
तिसऱया सत्रात भारतीय संघाचा आक्रमक पवित्रा दिसून येतोय
14:54 (IST) 24 Sep 2016
पुजाराचा लाँग ऑनच्या दिशेने चौकार, भारताची जोरदार फटकेबाजी
14:53 (IST) 24 Sep 2016
ईश सोधीच्या फुलटॉस चेंडूवर कव्हर्सच्या दिशेने खणखणीत चौकार, भारत १ बाद ७८
14:52 (IST) 24 Sep 2016
विजयनंतर पुजाराचा कव्हर्सच्या दिशेने चौकार, भारत १ बाद ७३
14:51 (IST) 24 Sep 2016
भारताकडे १२५ धावांची आघाडी
14:50 (IST) 24 Sep 2016
मुरली विजयचा शानदार स्विप शॉट, भारत १ बाद ६८ धावा
14:29 (IST) 24 Sep 2016
भारताला पहिला धक्का; के.एल. राहुल ३८ धावांवर बाद
14:17 (IST) 24 Sep 2016
भारताच्या १६ षटकांत बिनबाद ५१ धावा
13:36 (IST) 24 Sep 2016
लोकेश राहुलचे दोन चौकार; १४ चेंडूत ११ धावा
13:26 (IST) 24 Sep 2016
भारताकडून डावाची सावध सुरूवात; तीन षटकांत चार धावा
13:25 (IST) 24 Sep 2016
भारताकडून डावाची सावध सुरूवात
13:20 (IST) 24 Sep 2016
भारताच्या दुसऱ्या डावाला सुरूवात; लोकेश राहुल आणि मुरली विजय मैदानात
13:03 (IST) 24 Sep 2016
न्यूझीलंडचा पहिला डाव २६२ धावांत संपुष्टात, भारताकडे ५६ धावांची आघाडी
13:02 (IST) 24 Sep 2016
पुढच्याच षटकात अश्विनने टीपली न्यूझीलंडची अखेरची विकेट