कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवरील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३९ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी साकारली. कोलकाता कसोटीचा नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल दुखापतग्रस्त असल्याने संघात संधी मिळालेला शिखर धवन केवळ एक धाव करून माघारी परतला. त्यानंतर मुरली विजय देखील यावेळी मोठी खेळी करू शकला नाही. दोघांनाही न्यूझीलंडच्या मॉट हेन्रीने माघारी धाडले. कर्णधार कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात असताना त्यानेही निराशा केली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या दिशेने फटका मारण्याच्या नादात कोहलीच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू गलीमध्ये उभ्या असलेल्या लॅथमच्या हातात विसावला. कोहली केवळ ९ धावा करून माघारी परतला. भारतीय संघाचे पहिले तीन शिलेदार स्वस्तात माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघाचा डाव सावरून मैदानात चांगलाच जम बसवला. पुजाराने ८७ धावांचे, तर अजिंक्य रहाणेने ७७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारतीय संघाला सावरले. रहाणे बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि अश्विन देखील प्रत्येकी २ आणि २६ धावांवर माघारी परतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपूर्ण ९० षटकांचा होऊ शकला नाही. कमी सुर्यप्रकाशामुळे खेळ ८६ षटकांमध्येच थांबविण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ७ बाद २३९ अशी आहे. रवींद्र जडेजा(०) आणि वृद्धीमान साहा(१४) धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडकडून हेन्रीने तीन, तर फिरकीपटू जीतन पटेल याने दोन विकेट्स घेतल्या. बोल्ट आणि वँगर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

India vs New Zealand – दिवसभरातील अपडेट्स

Live Updates
16:37 (IST) 30 Sep 2016
पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारत २३९/७ (साहा- १४, जडेजा- ० )
16:36 (IST) 30 Sep 2016
आजच्या दिवसाचा खेळ कमी सुर्यप्रकाशामुळे ८६ षटकातच थांबवला, शेवटची चार षटके होऊ शकली नाहीत
16:35 (IST) 30 Sep 2016
हेन्रीच्या षटकात एकही धाव नाही, भारत ७ बाद २३९
16:33 (IST) 30 Sep 2016
रवींद्र जडेजा पायचीत होण्यासाठीची अपील, पण पंचांचा नकार
16:30 (IST) 30 Sep 2016
साहाचा कव्हर्सच्या दिशेने आणखी एक चौकार, भारत ७ बाद २३९
16:28 (IST) 30 Sep 2016
वृद्धीमान साहाचा शानदार स्ट्रेट ड्राईव्ह
16:27 (IST) 30 Sep 2016
हेन्रीच्या चेंडूवर अश्विन पायचीत, भारत ७ बाद २३५
16:25 (IST) 30 Sep 2016
भारतीय संघाला सातवा धक्का, अश्विन पायचीत
16:24 (IST) 30 Sep 2016
आजच्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी केवळ सात षटकांचा खेळ शिल्लक
16:20 (IST) 30 Sep 2016
अश्विन आणि साहाची संयमी फलंदाजी, भारत ६ बाद २२५
16:19 (IST) 30 Sep 2016
न्यूझीलंडने नवीन चेंडू स्विकारला, भारत ६ बाद २२१
16:13 (IST) 30 Sep 2016
आजच्या दिवसाच्या केवळ ९ षटकांचा खेळ शिल्लक, भारत ६ बाद २२१
16:08 (IST) 30 Sep 2016
वृद्धीमान साहाचा शानदार चौकार, भारत ६ बाद २२०
16:04 (IST) 30 Sep 2016
अश्विनचा आणखी एक चौकार, भारत ६ बाद २१२
16:04 (IST) 30 Sep 2016
अश्विनचे लागोपाठ दोन चौकार, भारत ६ बाद २०८
16:00 (IST) 30 Sep 2016
जतीन पटेलने घेतली अजिंक्य रहाणेची विकेट, भारत ६ बाद २०० धावा
15:59 (IST) 30 Sep 2016
भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का, अजिंक्य रहाणे ७७ धावांवर पायचीत
15:56 (IST) 30 Sep 2016
भारतीय संघाच्या सध्या २.७० च्या सरासरीने धावा, भारत ५ बाद १९९
15:52 (IST) 30 Sep 2016
७६ षटकांच्या अखेरीस भारत १९७/५ (रहाणे- ७६, अश्विन- ३)
15:47 (IST) 30 Sep 2016
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आर.अश्विन फलंदाजीसाठी मैदानात दाखल
15:46 (IST) 30 Sep 2016
जीतन पटेलच्या गोलंदाजीवर रोहित शर्माचा शॉर्ट लेगवर झेल टीपला
15:43 (IST) 30 Sep 2016
रोहित शर्माकडून निराशा, भारत ५ बाद १९३
15:40 (IST) 30 Sep 2016
रोहित शर्माच्या हाताला दुखापत, भारत ४ बाद १९३
15:40 (IST) 30 Sep 2016
रोहित आणि रहाणेमध्ये धाव घेताना समन्वयाचा अभाव, रोहित धावचीत होताना थोडक्यात बचावला
15:33 (IST) 30 Sep 2016
७२ षटकांच्या अखेरीस भारत १९६/४ (रहाणे- ७५ , रोहित- २ )
15:32 (IST) 30 Sep 2016
रोहित शर्मा आणि ईडन गार्डन्स हे समीकरण खूप चांगले राहिले आहे. या स्टेडियमवर आजवर रोहित शर्माने अनेक उल्लेखनीय खेळी साकारल्या आहेत.
15:31 (IST) 30 Sep 2016
रोहित शर्माकडून संयमी फलंदाजी
15:29 (IST) 30 Sep 2016
पुजारा बाद झाल्यानंतर रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात, भारत ४ बाद १९३
15:27 (IST) 30 Sep 2016
लेग स्लीपच्या दिशेने रहाणेचा सुंदर फ्लिक, चौकार
15:26 (IST) 30 Sep 2016
रहाणे पायचीत झाल्याची न्यूझीलंडची अपील, पण पंचांचा नकार
15:23 (IST) 30 Sep 2016
कव्हर्सच्या दिशेने फटका मारताना चेतेश्वर पुजाराचा मार्टिन गप्तीलने टीपला झेल, वँगरने घेतली विकेट
15:20 (IST) 30 Sep 2016
भारतीय संघाला चौथा धक्का, चेतेश्वर पुजारा ८७ धावांवर बाद
15:14 (IST) 30 Sep 2016
रहाणेकडून आता आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे. भारतीय फलंदाजांचा भारतीय धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न
15:13 (IST) 30 Sep 2016
रहाणेकडून थर्ड मॅनच्या दिशेने आणखी एक चौकार, भारत ३ बाद १८४
15:12 (IST) 30 Sep 2016
रहाणेचा पॉईंटच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद १८०
15:08 (IST) 30 Sep 2016
तिसऱया सत्रात देखील भारतीय संघाची चांगली फलंदाजी पाहायला मिळते आहे
15:05 (IST) 30 Sep 2016
चेतेश्वर पुजाराची शतकाच्या दिशेने कूच, ८० धावांचा टप्पा ओलांडला
15:05 (IST) 30 Sep 2016
६६ व्या षटकात पुजाराचे दोन चौकार, भारत ३ बाद १६३
15:01 (IST) 30 Sep 2016
ड्रींक्सची वेळ, भारत ३ बाद १५३
14:43 (IST) 30 Sep 2016
रहाणे आणि पुजाराची शतकी भागीदारी, भारताचा डाव सावरला
14:42 (IST) 30 Sep 2016
सँटनरच्या गोलंदाजीवर रहाणेचा डीप मिड विकेटच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद १४७
14:42 (IST) 30 Sep 2016
अजिंक्य रहाणेचे ९ वे आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक
14:40 (IST) 30 Sep 2016
रहाणेचे अर्धशतक पूर्ण, भारत ३ बाद १४२
14:36 (IST) 30 Sep 2016
६० षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद १४० (पुजारा- ६७ , रहाणे- ४८)
14:35 (IST) 30 Sep 2016
रहाणेचा बॅकफूटवरून पॉईंटच्या दिशेने फटका, एक धाव
14:33 (IST) 30 Sep 2016
कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवसातील तिसऱया सत्राला सुरूवात
14:15 (IST) 30 Sep 2016
दुसऱया सत्रात एकूण ३१ षटकांमध्ये भारताने कुटल्या ७९ धावा.
14:15 (IST) 30 Sep 2016
दुसरे सत्र, भारतासाठी समाधानकारक. दुसऱया सत्रात एकही विकेट नाही.