वानखेडे कसोटीत इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवसाअखेरीस ५ बाद २८८ धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडकडून यावेळी किटॉन जेनिंग्स याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी साकारून संघाला दमदार सुरूवात करून दिली. तर भारतीय संघाकडून नेहमीप्रमाणे फिरकीपटू आर.अश्विन याने आपल्या अफलातून फिरकीवर इंग्लंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडले. अश्विनने चार, तर जडेजाने एक विकेट घेतली. भारताच्या वेगवान गोलंदाजांना यावेळी एकही विकेट मिळवता आली नाही.

सामन्याचा नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार अलिस्टर कूक आणि किटॉन जेनिंग्स यांनी संयमी फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. शतकी भागीदारीसाठी केवळ एका धावेची आवश्यकता असताना अॅलिस्टर कूक ४६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले. जडेजाच्या फिरकीवर अॅलिस्टर कूक स्टम्पिंग बाद झाला. पहिल्या सत्रात इंग्लंडने १ बाद ११७ धावा केल्या. उपहारानंतरच्या खेळात जेनिंग्सने मैदानात टीच्चून फलंदाजी करत कसोटी कारकीर्दीतील आपले पहिलेवहिले शतक पूर्ण केले. अश्विनने भारतीय संघाला दुसरे यश मिळवून देत जो रुट याला स्लिपमध्ये झेलबाद केले. विराट कोहलीने जो रुटचा अप्रतिम झेल टीपला.

जो रुट बाद झाल्यानंतर मोईन अली याने जेनिंग्सला चांगली साथ देत इंग्लंडच्या धावसंख्येला आकार दिला. मोईन अलीने अर्धशतक ठोकले. या दोघांनी संघाला दोनशेचा आकडा गाठून दिला. मग तिसऱया सत्रात अश्विनने एकाच षटकात जेनिंग्स आणि मोईन अली या मैदानात जम बसविलेल्या खेळाडूंना माघारी पाठवून भारतीय संघाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. मोईन अली ५० धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला, तर जेनिंग्स ११२ धावांवर पुजाराकरवी झेलबाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही षटकांचा अवधी असतानाच अश्विनने इंग्लंडच्या बेअरस्टोला चालते केले. सामन्याच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टीवर फिरकीला चांगली साथ मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे दुसऱया दिवशी खेळपट्टीचा नूर कसा असेल? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

वाचा: भुवनेश्वर कुमारचा चेंडू लागल्याने पंच पॉल रिफेल गंभीर जखमी

दरम्यान, सामन्याचा ४९ व्या षटकात एक धक्कादायक प्रकार घडला. अश्विनच्या फिरकीवर इंग्लंडच्या जेनिंग्स याने स्वेअर लेगला फटका खेळला होता. भुवनेश्वर कुमार चेंडू अडवून यष्टीरक्षक पार्थिव पटेलच्या दिशेने फेकला, पण स्वेअर लेगवर उभ्या असलेल्या पंचाच्या डोक्यावर चेंडू आदळला. पंच पॉल रिफेल जखमी झाले. डोक्यावर चेंडू आदळल्याने ते जागीच कोसळले, सर्वांनी त्वरित त्यांच्याकडे धाव घेतली. स्टेडियमवर इंग्लंडच्या वैद्यकीय पथकातील फिजिओ देखील दाखल झाले. रिफेल यांना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. मग तिसरे पंच मारीस यांनी मैदानाचा ताबा घेऊन सामना पुन्हा सुरू केला. पॉल रिफेल यांची एमआरआय चाचणी करण्यात आल्यानंतर काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. रिफेल यांना एका दिवसाचा आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

 

Cricket Score Updates , India v England: दिवसभरातील अपडेट्स 

Live Updates
16:32 (IST) 8 Dec 2016
जडेजाकडून निर्धाव षटक, पहिल्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या ५ बाद २८८ धावा
16:30 (IST) 8 Dec 2016
जडेजाकडून पहिले तीन चेंडू निर्धाव
16:30 (IST) 8 Dec 2016
पहिल्या दिवसातील शेवटचे षटक
16:30 (IST) 8 Dec 2016
अश्विनच्या षटकात सहा धावा
16:24 (IST) 8 Dec 2016
आजच्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी शेवटच्या दोन षटकांचा खेळ शिल्लक
16:22 (IST) 8 Dec 2016
९१ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ५ बाद २७९ धावा
16:20 (IST) 8 Dec 2016
भारताचा रिव्ह्यू वाया, स्टोक्स नाबाद
16:18 (IST) 8 Dec 2016
जडेजाकडून रिव्ह्यूची मागणी
16:18 (IST) 8 Dec 2016
जडेजाच्या फिरकीवर बेन स्टोक्स पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
16:17 (IST) 8 Dec 2016
९० षटकांचा खेळ संपला, इंग्लंड ५ बाद २७५ धावा
16:14 (IST) 8 Dec 2016
बटलर आणि स्टोक्सची संयमी फलंदाजी
16:00 (IST) 8 Dec 2016
जयंत यादवच्या फिरकीवर बेन स्टोक्सचा झेल टीपण्याची संधी हुकली
15:53 (IST) 8 Dec 2016
८३ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ५ बाद २५९ धावा
15:46 (IST) 8 Dec 2016
इंग्लंडने २५० धावांचा टप्पा गाठला
15:46 (IST) 8 Dec 2016
अश्विनच्या फिरकीवर बेअरस्टो १४ धावांवर झेलबाद होऊन माघारी
15:46 (IST) 8 Dec 2016
इंग्लंडची पाचवी विकेट, बेअरस्टो बाद
15:27 (IST) 8 Dec 2016
७७ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ४ बाद २३९ धावा
15:15 (IST) 8 Dec 2016
चेतेश्वर पुजाराने टीपला जेनिंग्सचा झेल
15:14 (IST) 8 Dec 2016
मोईन अली अर्धशतक ठोकून माघारी, करुण नायरने टीपला झेल
15:13 (IST) 8 Dec 2016
अश्विनच्या एकाच षटकात दोन विकेट्स
15:13 (IST) 8 Dec 2016
दुसऱया सत्रात इंग्लंडला दोन धक्के
14:04 (IST) 8 Dec 2016
६० षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद १९३ धावा
13:59 (IST) 8 Dec 2016
१८८ चेंडूत जेनिंग्सने पूर्ण केले आपले पहिलेवहिले कसोटी शतक
13:58 (IST) 8 Dec 2016
किटॉन जेनिंग्सची कसोटी पदार्पणातच शतकी खेळी
13:52 (IST) 8 Dec 2016
किटॉन जेनिंग्सची शतकाच्या दिशेने कूच, इंग्लंड २ बाद १८५ धावा
13:46 (IST) 8 Dec 2016
५६ षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद १८१ धावा
13:24 (IST) 8 Dec 2016
पंच पॉल रिफेल यांना भुवनेश्वर कुमारचा चेंडू लागल्याने दुखापत, रिफेल यांना रुग्णालयात हलवले
13:21 (IST) 8 Dec 2016
भुवनेश्वर कुमारने सीमा रेषेवरून फेकलेला चेंडू स्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर आदळला
12:41 (IST) 8 Dec 2016
अश्विनच्या फिरकीवर जो रुट स्लिपमध्ये झेलबाद, कोहलीने टीपला झेल
12:38 (IST) 8 Dec 2016
अश्विनने मिळवून दिले भारतीय संघाला दुसरे यश, जो रुट बाद
12:19 (IST) 8 Dec 2016
३३ षटकांच्या अखेरीस इंग्लंड १ बाद १२१ धावा
12:18 (IST) 8 Dec 2016
अश्विनकडून दमदार गोलंदाजी, इंग्लंड १ बाद ११८ धावा
12:18 (IST) 8 Dec 2016
उपहारानंतरच्या खेळाला सुरूवात, इंग्लंड १ बाद ११७ धावा
11:40 (IST) 8 Dec 2016
उपहारापर्यंत इंग्लंड १ बाद ११७ धावा. (जेनिंग्स- ६५, रुट- ५)
11:28 (IST) 8 Dec 2016
जेनिंग्सचा आणखी एक चौकार
11:24 (IST) 8 Dec 2016
जेनिंग्सचा जयंत यादवच्या फिरकीवर स्ट्रेट ड्राईव्ह चौकार
11:22 (IST) 8 Dec 2016
जडेजाची उत्तम फिरकी, जो रुट बचावला
11:17 (IST) 8 Dec 2016
इंग्लंडच्या धावसंख्येचे शतक
11:17 (IST) 8 Dec 2016
अलिस्टर कूक बाद झाल्यानंतर जो रुट फलंदाजीसाठी मैदानात
11:14 (IST) 8 Dec 2016
अलिस्टर कूक फ्रंटफूटवरून खेळण्याच्या नादात स्टम्पिंग बाद
11:14 (IST) 8 Dec 2016
रवींद्र जडेजाने मिळवून दिले पहिले यश, अलिस्टर कूक ४६ धावांवर बाद
11:12 (IST) 8 Dec 2016
गोलंदाजीत बदल, रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी पाचारण
11:08 (IST) 8 Dec 2016
अलिस्टर कूकचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार
11:08 (IST) 8 Dec 2016
जेनिंग्सचे पहिलेवहिले कसोटी अर्धशतक
11:06 (IST) 8 Dec 2016
किटॉन जेनिंग्सचे पदार्पणातच अर्धशतक
11:05 (IST) 8 Dec 2016
कूकचा आणखी एक खणखणीत चौकार
11:05 (IST) 8 Dec 2016
अलिस्टर कूकचा डीप मिड विकेटवर चौकार
11:05 (IST) 8 Dec 2016
अश्विनच्या फिरकीवर कूक पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
11:04 (IST) 8 Dec 2016
जयंत यादवकडून निर्धाव षटक, इंग्लंड बिनबाद ८१ धावा
11:03 (IST) 8 Dec 2016
जयंत यादवची अफलातून फिरकी, जेनिंग्स बचावला