लोकेश राहुलची दमदार ९६ धावांची खेळी आणि कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या चार दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ६ बाद २२१ अशी मजल मारली आहे.
चेपॉकच्या खेळपट्टीवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताल २० धावांवर पहिला धक्का बसला, पण त्यानंतर राहुल आणि पुजारा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. पुजाराने या वेळी ७ चौकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी केली. पुजारा बाद झाल्यावरही राहुलने एका बाजूने संघाचा डाव सावरला खरा, पण त्याचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. वेगवान गोलंदाज सीन अ‍ॅबॉटने राहुलला कर्णधार उस्मान ख्वाजाकरवी झेलबाद केले. राहुलने १४ चौकारांच्या जोरावर ९६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ (पहिला डाव) : ७७.१ षटकांत ६ बाद २२१ (के. एल. राहुल ९६, चेतेश्वर पुजारा ५५; अँड्रय़ू फेकेतेने २/३८) वि. ऑस्ट्रेलिया ‘अ’.