‘भारतीय संघाने लॉर्डसवर इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविला. यापुढे लॉर्डसवर मी कसोटी सामना खेळणे अवघड आहे.’ असे म्हणत भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
याआधी धोनीने शारिरिक तंदुरुस्तीवरच मी माझ्या निवृत्तीचा निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी लॉर्डसवरील विजयावर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला की,”प्रत्येक कसोटी सामन्याला विशेष महत्व असते. त्यात भारताबाहेर कसोटी सामना जिंकणे म्हणजे, उल्लेखनीयबाब आहे. लॉर्डसवरील हा माझा अखेरचा सामना आहे. यानंतर लॉर्डसवर खेळणे अवघड आहे. त्यामुळे हो, हा विजय माझ्यासाठी संस्मरणीय राहील.” असेही धोनी म्हणाला.
धोनीच्या या सूचक वक्तव्यामुळे भारतीय संघाच्या निवड समितीलाही धोनीच्या उत्तराधिकाऱयाचा शोध घ्यावा लागणार आहे.