भारताचा बॉक्सिंगपटू मदन लालचे जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. ५२ किलो वजनी गटात राष्ट्रीय विजेत्या मदन लालला युरोपियन स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या इटलीच्या व्हिंसेंजो पिकार्डीकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. या स्पध्रेत गुरुवारी भारताचा एकमेव सामना होता. मदनने पहिल्या फेरीत दमदार सुरुवात केली, परंतु इटलीच्या खेळाडूचे आक्रमण थोपवण्यात त्याला अपयश आले. पिकार्डीने आपल्या अनुभवाचा फायदा उचलताना भारतीय खेळाडूचा बचाव खिळखिळा केला आणि सामन्यात विजय पक्का केला.