महाराष्ट्र बुद्धिबळ लीगच्या (एमसीएल) तिसऱ्या सत्रासाठी शुक्रवारी पार पडलेल्या लिलावात आंध्र प्रदेशची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी सर्वात महागडी खेळाडू ठरली. मुंबई मुव्हर्सने तिला एक लाख ५२ हजार रुपयांची बोली लावत चमूत दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे अटॅकर्सने ओरिसाची आंतरराष्ट्रीय मास्टर्स पद्मिनी राऊतला एक लाख ५० हजार रुपयांत संघात सहभागी केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये महिला ग्रँडमास्टर इशा करवडेने ‘लक्ष’वेधी भरारी घेतली. तिला एक लाख १४ हजार रुपयांमध्ये ठाणे कॉम्बॅटन्ट्सने संघात सहभागी करून घेतले.
मुंबईत पार पडलेली ही लिलाव प्रक्रिया जवळपास तीन तास चालली. सहा संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये पुणे ट्रू मास्टर्स संघाने सर्वाधिक ३ लाख ९७ हजार रुपये खर्च केले. एमसीएलचे तिसरे सत्र जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात खेळविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेखाली पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे पाच दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.
स्पध्रेचे स्वरूप
संघ : मुंबई मुव्हर्स, पुणे अटॅकर्स, जळगाव बॅटलर्स, अहमदनगर चेकर्स, पुणे ट्रु मास्टर, ठाणे कोम्बॅटन्ट

नियम :
*प्रत्येक संघात सहा खेळाडू
*प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळतील
*अव्वल चार संघ उपांत्य फेरीत
महाराष्ट्राची ईशा करवडे ‘लक्ष’वेधी

मुंबई मुव्हर्स :
राकेश कुलकर्णी (महाराष्ट्र)    
कोनेरू हम्पी (आंध्र प्रदेश)    
विक्रमादित्य कुलकर्णी (महाराष्ट्र)    
दीप्तयन घोष (पश्चिम बंगाल)    
शाल्मली गागरे (महाराष्ट्र)    
वैभव सुरी (नवी दिल्ली)

ठाणे कॉम्बॅटन्ट्स
अभिमन्यू पुराणिक (महाराष्ट्र)
अरविंद चितंबरम (तामिळनाडू)
ललित बाबू (आंध्र प्रदेश)    
सौम्या स्वामिनाथन (महाराष्ट्र)    
इशा करवडे  (महाराष्ट्र)    
रत्नाकरन (केरळ)    
चिन्मय कुलकर्णी

अहमदनगर चेकर्स
शार्दूल गागरे (महाराष्ट्र)    
विग्नेश एनआर (तामिळनाडू )    
एम शामसुंदर (तामिळनाडू)    
अभिजीत गुप्ता (राजस्थान)    
्नऋचा पुजारी (महाराष्ट्र)
आकांक्षा हगवणे (महाराष्ट्र)
प्रतीक पाटील (महाराष्ट्र)    
एस एल नारायणन (तामिळनाडू)    

पुणे अटॅकर्स
स्वप्निल धोपडे (महाराष्ट्र)    
थेजकुमार एम.एस (कर्नाटक)    
वेंकटेश एम. आर (तामिळनाडू)
पद्मिनी राऊत (ओरिसा)    
प्रणाली धारिआ (महाराष्ट्र)    
अनिरुद्ध देशपांडे  (महाराष्ट्र)    

जळगाव बॅटलर्स
विदित गुजराथी (महाराष्ट्र)    
बी अदिबान (तामिळनाडू)    
किरण एम मोहंती (ओरिसा)
श्रीनाथ नारायणन (तामिळनाडू)    
ऋतुजा  बाक्शी (महाराष्ट्र)    
नुबैरशाह शेख (महाराष्ट्र)    

पुणे ट्रू मास्टर्स
एसपी सेतुरामण (तामिळनाडू)
स्वाती घाटे (महाराष्ट्र)    
अभिजीत कुंटे (महाराष्ट्र)    
मारू एम गोम्स (प. बंगाल)    
स्वायम्स मिश्रा (ओरिसा)
अभिषेक केळकर (महाराष्ट्र)
शशिकांत कुतवल (महाराष्ट्र)