नताशा प्रधान आणि लीला फड या दोन्ही महाराष्ट्राच्या मुलींनी शिवाजी मंदिरात झालेल्या राज्य निवड चाचणीत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या विश्व शरीरसौष्ठव आणि फिजिक स्पोर्ट्स अजिंक्यपद (मिस्टर वर्ल्ड) शरीरसौष्ठव स्पर्धेकरिता भारतीय संघ निवडण्यासाठी होणाऱ्या निवड चाचणी स्पध्रेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड या वेळी करण्यात आली. पुरुषांमध्ये संग्राम चौगुले, स्वप्निल नरवडकर, सुनीत जाधव, सागर कातुर्डे आणि आशीष साखरकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ
पुरुष – ६० किलो : अरुण पाटील (कोल्हापूर), सुनील सकपाळ (मुंबई). ६५ किलो : नितीन म्हात्रे (मुंबई). ७० किलो : श्रीनिवास वसके (कोल्हापूर). ७५ किलो : संदीप कडू (पुणे), क्रेग सिक्वेरा, स्वप्निल नरवडकर (दोघेही मुंबई). ८० किलो : चंद्रशेखर पराव (कोल्हापूर), सागर कातुर्डे, आशीष साखरकर (दोघेही मुंबई). ८५-९० किलो : सुनीत जाधव, सागर माळी (दोघेही मुंबई), अमित वाघमारे (पुणे), बी. महेश्वरन (नाशिक). १०० किलो : जगदीश लाड (नवी मुंबई), अमित पाटील (रायगड), देवेंद्र भोईर, अक्षय मोगरकर (दोघेही मुंबई). १०० किलोवरील : संग्राम चौगुले (पुणे), गणेश उरणकर, दीपक त्रिपाठी (दोघेही मुंबई). महिला : नताशा प्रधान आणि लीला फड.