30 May 2016

मँचेस्टर सिटी, अर्सेनेलला पराभवाचा धक्का

मँचेस्टर सिटी आणि अर्सेनेल संघांना चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. मँचेस्टर

पी.टी.आय. पॅरिस | December 6, 2012 5:38 AM

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा

मँचेस्टर सिटी आणि अर्सेनेल संघांना चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. मँचेस्टर सिटीला युरोपा लीग स्पर्धेतही स्थान पटकावता आले नाही. बॉरुसिया डॉर्टमंडने सिटीवर १-० अशी मात केली. ज्युलियन स्काइबरने ५७व्या मिनिटाला जाकुब ब्लासझकोवस्कीच्या क्रॉसवर सुरेख गोल करत डॉर्टमंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
या विजयासह डॉर्टमंडने गटात अग्रस्थान राखले तर सिटीला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. अर्सेनेलला ऑलिम्पिआकोसने २-१ने नमवले. रिअल माद्रिदकडून ४-१ असा पराभव होऊनही अजॅक्सने युरोपा लीग स्पर्धेत स्थान पटकावले. रिअलतर्फे कॅलेजॉनने २ तर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि काकाने प्रत्येकी १ गोल केला

First Published on December 6, 2012 5:38 am

Web Title: manchester city arsenal got shock of lost