फुटबॉल जगतात सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या क्लबमध्ये मँचेस्टर युनायटेडने रिअल माद्रिद आणि बायर्न म्युनिक यांना पिछाडीवर टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. २०१४-१५च्या सत्रात एकही जेतेपद पदरी नसलेल्या युनायटेडला १.२ अब्ज डॉलर इतकी ‘ब्रँड व्हॅल्यू’ मिळाली आहे आणि अब्जावधी डॉलरचा टप्पा पार करणारा तो पहिला क्लब आहे. ‘दी ब्रँड फायनान्स फुटबॉल’ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. या यादीत म्युनिक दुसऱ्या, तर माद्रिद तिसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांचा क्रमांक येतो. यंदाचे सत्र गाजवणाऱ्या बार्सिलोनाच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’मध्ये २८ कोटी डॉलरची वाढ झाली असली तरी या यादीत त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
क्लब        बाजारमूल्य
             (अब्ज डॉलर)
मँचेस्टर युनायटेड    १.२
बायर्न म्युनिक    ०.९३
रिअल माद्रिद    ०.८७
मँचेस्टर सिटी    ०.८०
चेल्सी        ०.७९
बार्सिलोना   .७७