अभिमन्यू पुराणिक व आकांक्षा हगवणे यांनी महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिलांच्या खुल्या गटात विजेतेपद पटकाविले. पुरुषांच्या बिगरमानांकित गटात राजेश वटकर याने अजिंक्यपद मिळविले. प्रौढांच्या विभागात एल.पी.खाडिलकर यांना प्रथम स्थान मिळाले. मुलांच्या गटात अमोघ कुंटे (८ वर्षे), आतिश भयानी (१० वर्षे), अमेय कर्नावट (१२ वर्षे), केविन डीसूझा (१४ वर्षे), ओंकार शेळके (१६ वर्षे), हर्षद अगावणे (१८ वर्षे), कणाद आफळे (२० वर्षे), रोहन जोशी (२५ वर्षे) यांनी प्रथम स्थान पटकाविले. मुलींमध्ये मृदुल कांबळे (८ वर्षे), ईश्वरी गोयल (१० वर्षे), आर्या पिसे (१२ वर्षे), सिद्धी शेठ (१४ वर्षे), निकिता परदेशी (१६ वर्षे), दुर्वा चालक (१८ वर्षे), ऋतुजा कापर्डेकर (२० वर्षे) यांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य मिलिंद पोकळे यांच्या हस्ते झाला. या वेळी संघटक जोसेफ डीसूझा, राजेश कोंडे, विजय उत्तुरे उपस्थित होते.