युएफा अर्थात युरोपियन फुटबॉल संघटना युनियनतर्फे देण्यात येणाऱ्या २०१४-१५ वर्षांसाठीचा सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारासाठी लिओनेल मेस्सीची निवड करण्यात आली. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लुईस सुआरेझ यांना मागे टाकत मेस्सीने या पुरस्कारावर नाव कोरले. बार्सिलोनाचे प्रतिनिधित्त्व करताना चॅम्पियन्स लीग, ला लिगा तसेच स्पॅनिश चषकाचे जेतेपद मिळवून देण्यात मेस्सीने निर्णायक भूमिका बजावली होती. मेस्सीने दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला. २०१०-११ वर्षांत मेस्सीची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.