अव्वल क्रमांकाच्या दिशेने सुसाट निघालेल्या यू मुंबा एक्स्प्रेसने बंगळुरू बुल्सचा ३९-१८ असा धुव्वा उडवला. या विजयासह मुंबईने ४० गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. अन्य एका सामन्यात पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीचा ६७-३४ असा धुव्वा उडवला. या विजयासह पाटणाने सर्वात मोठय़ा विजयाची नोंद केली. यापूर्वी २०१४ मध्ये तेलुगू टायटन्सने पुणेरी पलटणला ६०-२४ असे पराभूत केले होते.
या सामन्यात मुंबईने बंगळुरूवर तीन लोण चढवले. नवव्या मिनिटाला रिशांकने दोन गुण मिळवत बंगळुरूवर पहिला लोण चढवला, तर अनुपने चढाईमध्ये एक गुण मिळवत २३व्या मिनिटाला दुसरा लोण चढवला. ३०व्या मिनिटाला बंगळुरूच्या श्रीकांतची दमदार पकड करत मुंबईने तिसरा लोण वसूल केला.

आजचे सामने
पुणेरी वि. तेलुगू टायटन्स
दिल्ली वि. जयपूर पिंक पँथर्स
वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३