शरद पवार अध्यक्ष असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए)लोढा समितीने दिलेल्या शिफारशी मान्य नसल्याचे संकेत सोमवारी मिळाले. ‘‘या समितीच्या बऱ्याच शिफारशी आम्हाला अमान्य आहेत आणि आम्ही त्याला विरोध करणार आहोत. आमच्या या निर्णयाच्या पाठिशी पवारही असतील. आम्ही लोढा समितीच्या शिफारशींवर १३ जानेवारीला चर्चा करणार आहोत. या शिफारशींमुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना धक्का बसणार आहे. त्याचबरोबर चाळीसवेळा रणजी चषक पटकावलेल्या मुंबईचेही नुकसान होईल,’’ असे एमसीएचे संयुक्त सचिव पी.व्ही. शेट्टी यांनी सांगितले.