मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भातील वाद आता मुंबई उच्च न्यायालयात रंगणार आहे. या याचिकेची पुढील सुनावणी २३ डिसेंबरला होणार आहे.
मुंबई कबड्डी असोसिएशनच्या २८ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत उमेदवार अंकुश जाधव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात गुरुवारी त्यांनी आपली बाजू मांडली. निवडणुकीची प्रक्रिया प्रशासन नेमून पूर्ण करावी आणि घटनेचे पालन करून त्यानुसार संघांची छाननी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे.
दरम्यान, सत्ताधारी मारुती जाधव यांचे २५ सदस्यीय पॅनेल निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, त्यांना अनिल घाटे यांच्या २३ सदस्यीय गटाने आव्हान दिले आहे. घाटे यांच्या गटाचे २५ सदस्य होऊ न शकल्यामुळे पॅनेल झाले नाही. त्यामुळे हे २३ उमेदवार स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असतील. तर राजाराम पवार यांनी घाटे गटाला आपला पाठींबा दिला आहे.
जाधव पॅनेलमध्ये भाई जगताप, मिलिंद तुळसकर, शिवकुमार लाड, विश्वास मोरे, मनोहर इंदूलकर यांचा समावेश आहे, तर घाटे गटात भार्गव कदम, वसंत सूद, मनोहर साळवी यांचा समावेश आहे.

निवडणुकीसाठी वैध उमेदवारांची यादी-
मारुती जाधव पॅनेल : प्रभाकर अमृते, सुधीर देशमुख, मनोहर इंदूलकर, मारुती जाधव, रामचंद्र जाधव, अशोक ऊर्फ भाई जगताप, शरद कालंगण, अनिल केशव, शिवकुमार लाड, दीपक मसुरकर, विश्वास मोरे, भरत मुळे, राजेश पाडावे, अंकुश पाताडे, दिनेश पाटील, शुभांगी पाटील, सतीश पवार, चंद्रशेखर राणे, संजय शेटे, आनंदा शिंदे, दिगंबर शिरवाडकर, राजेश शिवतरकर, संजय सूर्यवंशी, कृष्णा तोडणकर, मिलिंद तुळसकर.
स्वतंत्र उमेदवार (अनिल घाटे गट) : रमेश बारस्कर, ललिता भोसले, सूर्यकांत भोईटे, सुशील ब्रीद, आशिष चौगले, अभिषेक एकल, अनिल घाटे, अंकुश जाधव, भार्गव कदम, वसंत खोपकर, नरेंद्र कोरगावकर, अजय कुसुम, दत्ताराम पारकर, मधुकर पाटील, शैलेश पाटील, राजू राव, गणेश रेवणे, सुभाष साईल, दर्पण साखरकर, मनोहर साळवी, मनीष सावंत, वसंत सूद, संजय वाघधरे.