महाराष्ट्राच्या संघाची निराशाजनक कामगिरी

सामन्याचा चौथा दिवस. संथ झालेली खेळपट्टी. फिरकीपटूंना मिळणारी मदत आणि विजयासाठी ७० षटकांमध्ये २९५ धावांचे लक्ष्य. तसे सारेच आव्हानात्मक. पण पहिल्या डावात आघाडी मिळवूनही मुंबईने रेल्वेचे हे आव्हान फक्त स्वीकारलेच नाही तर विजयाचा झेंडाही फडकवला. फलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर मुंबईने रेल्वेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आणि ‘ब’ गटात २६ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले.
श्रेयस अय्यर आणि अखिल हेरवाडकर यांनी शानदार फलंदाजी करीत विजयाचा पाया रचला. त्यावर कर्णधार आदित्य तरे आणि सिद्धेश लाड यांनी कळस चढवला. दोन्ही धावांत दमदार फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर अखिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
रेल्वे (पहिला डाव) : २१७
मुंबई (पहिला डाव) : ३३१
रेल्वे (दुसरा डाव) : १०४ षटकांत ४ बाद ४०८ डाव घोषित (सौरभ वाकस्कर १८५, व्ही. चेलुव्हराज नाबाद १३३; विशाल दाभोळकर ३/११५, सिद्धेश लाड १/२८).
मुंबई (दुसरा डाव) : ६४ षटकांत ४ बाद २९५ (श्रेयस अय्यर ९१, अखिल हेरवाडकर ७५, आदित्य तरे नाबाद ७१, सागर मिश्रा २/५३).
सामनावीर : अखिल हेरवाडकर.

हा विजय आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी २९५ धावा करणे सोपे नव्हते. पण फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचलो असलो तरी त्याच्याकडे आमचे लक्ष नाही. आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे.
– आदित्य तरे, मुंबईचा कर्णधार