अनिल कुंबळे हे आपल्या देशातील अव्वल दर्जाचे फिरकी गोलंदाज होते आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची सुवर्णसंधी आहे, असे भारताचा फलंदाज मुरली विजयने सांगितले.

‘‘कारकीर्दीतील माझा पहिला कसोटी सामना हा कुंबळे यांच्या कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना होता. त्या वेळी त्यांच्याकडून मला फारसे शिकता आले नाही. भारतीय संघातील युवा खेळाडूंना कुंबळे यांच्याकडून मैदानावरील व मैदानाबाहेरील वर्तन याबाबत खूप काही चांगले शिकायला मिळणार आहे,’’ असे विजयने सांगितले.

विराट कोहली यांच्यातील समन्वयाविषयी विजय म्हणाला, ‘‘सध्या याबाबत सांगता येणार नाही, कारण कुंबळे यांच्या कारकीर्दीला आता सुरुवात होत आहे.’’