हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर शुक्रवारी पावसामुळे  दोन्ही सामने होऊ शकले नाहीत. ओमानविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकामधून नेदरलँड्सचे, तर बांगलादेशविरुद्धचा सामना रद्द झाल्याने आर्यलडचे आव्हान संपुष्टात आले आहे. बांगलादेश-आर्यलड सामना आधी १२ षटकांचा करण्यात आला. मात्र ८ षटकांत बांगलादेशची २ बाद ९४ अशी स्थिती असताना मुसळधार पावसामुळे खेळ थांबवण्यात आला.